मित्र मंडळींनी दिला अनपेक्षित धक्का, पावसकर कुटुंबाला भावना अनावर
गुहागर, ता. 09 : तालुक्यातील खालचापाट येथील श्री अनंत पावसकर यांचा 80 वा वाढदिवस आज अचानक त्यांना कोणतीही कल्पना न देता प्रशांत कांबळे व त्याच्या मित्रमंडळीने साजरा केला. यावेळी पहिल्यांदाच त्यांचा वाढदिवस अशा प्रकारे साजरा केल्याने पावसकर यांना आनंदाश्रू आवरले नाहीत. Friends gave an unexpected shock
अनंत पावसकर हे गेली 40 वर्ष श्री वराती मंदिरात वरातीची पूजा व साफसफाई चे काम नित्य नियमाने करीत आहेत. तसेच हातगाडीचा व्यवसाय आहे. अतिशय कष्ट आणि मेहनत करणारे, बसल्या बैठकीला शे दोनशे नारळ कोयती वर सोलणारे, 100 किलोची पिशवी सहज उचलणारे असे गुहागरात ते परिचित आहेत. Friends gave an unexpected shock


आज-काल वाढदिवस म्हटल्यावर धुमधडाक्यात हॉल बुक करून मोठ्या दणक्यात उपस्थित सर्वांना भोजन देऊन साजरा करण्यात येतो. परंतु समाजात असेही काही लोक आहेत की, त्यांचा कधी वाढदिवस साजरा करण्यात आलेला नाही. असेच एक अनंत पावसकर यांचाही वाढदिवस साजरा करून एक नवीन पायंडा पाडण्याची आवश्यकता असल्याचे प्रशांत कांबळे व मित्र मंडळ परिवारांनी दाखवून दिले. या वाढदिवसाला प्रशांत कांबळे, नाना पाटील, दशरथ जांगळी, अशोक बेंडल, सुहास सातार्डेकर, धनंजय खातू, सर्वेश भावे, प्रभुनाथ देवळेकर, नाना कनगुटकर, अभिजीत हळये, नाना आरेकर, विष्णू सांगळे, सुधीर कदम व मुरलीधर गोयथळे आधी उपस्थित होते. Friends gave an unexpected shock