लायन्स क्लब व महिला पतंजली योग समिती गुहागर यांचे आयोजन
गुहागर, ता.06 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी व महिला पतंजली योग समिती, गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर पाच दिवसीय असून मोफत आहे. दुर्गादेवी देवस्थान वरचापाट, गुहागर येथे दि. ०७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर 2022 सायंकाळी ४.३० ते ६.३० वा. शिबीर घेण्यात येणार आहे. Free Yoga Camp
*या शिबिरामध्ये योग, ध्यान, प्राणायाम घेतले जाणार आहेत. यासाठी महिला पतंजली योग समितीच्या रत्नागिरी जिल्हा प्रभारी सौ. रमाताई जोग व गुहागर तालुका प्रभारी सौ. अनुराधा दामले या मार्गदर्शन करणार आहेत. तसेच शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी आपल्या सोबत सतरंजी, योगामॅट, पाण्याची बाटली, वही, पेन घेऊन यावे. असे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष शामकांत खातू, सेक्रेटरी संतोष वरंडे, खजिनदार सचिन मुसळे यांनी केले आहे. शिबीर उद्घाटन कार्यक्रम शुक्रवार दि. ७ ऑक्टोबर सायं. ४.१५ वा. दुर्गादेवी देवस्थान येथे करण्यात येणार आहे. तरी लायन्स सदस्य व कुटुंबातील व्यक्ती, बंधु व भगिनी यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे. Free Yoga Camp
आजच्या धकाधकीच्या जीवनात निरामय जीवनशैली करीता योग साधना करणे, प्राणायाम करणे आवश्यक आहे. असे लायन्स क्लबचे अध्यक्ष शामकांत खातू यांनी सांगितले. तरी या योग शिबीरासाठी बहूसंख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे. Free Yoga Camp