गुहागर, ता. 03 : तालुक्यातील शृंगारतळी येथे सारथी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मार्फत काथ्यापासून विविध आर्टिकल तयार करणे या तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे (SARTHI) व महाराष्ट्र उद्योजकता विकसित विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकास योजना या योजनेअंतर्गत कुणबी, मराठा, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या समाजातील युवती आणि महिलांकरिता कॉयर आर्टिकल वर आधारित मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे एक महिना कालावधीचे शृंगारतळी येथे आयोजित करण्यात येत आहे. Free training for Kunbi Maratha women


या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये काथ्यापासून विविध आर्टिकल, दोरी बनवणे, पायपुसणे या प्रात्यक्षिका सोबत शासनाच्या विविध योजना, प्रकल्प अहवाल, बाजारपेठ उद्योगाचे व्यवस्थापन, विक्री कौशल्य, संभाषण कौशल्य, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास इत्यादी विषयांवर रोज सकाळी 11 ते 5 या वेळेत तज्ञांमार्फत मार्गदर्शन होणार आहे. Free training for Kunbi Maratha women
सदर प्रशिक्षणात भाग घेऊ इच्छिणारा लाभार्थी 8 वी पास, वय वर्ष 18 ते 45 , महाराष्ट्र राज्याचा रहिवासी तसेच स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याची प्रबळ इच्छा शक्ती असणारा असावा. यासाठी शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, आधार कार्ड व उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक असून अधिक माहितीकरिता प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मोबाईल क्र.९४०३०७८७६७ द्वारा पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ता. गुहागर येथे अधिक माहितीसाठी १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत संपर्क साधावा. Free training for Kunbi Maratha women