दि. २५ रोजी जांगळेवाडी शाळेच्या मैदानावर शिबीराचे आयोजन
गुहागर, ता. 23 : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गुहागर शहर युवा सेनेच्यावतीने रविवार दि. २५ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ४ या वेळेत खालचापाट येथील जांगळेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन मा. आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते सकाळी 9.30 वाजता करण्यात येणार आहे. तरी या आरोग्य शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन युवासेना शहर प्रमुख राज विखारे यांनी केले आहे. Free Health Camp by Yuva Sena
या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन, मोफत कर्करोग तज्ञांचे मार्गदर्शन, मोफत ईसीजी, रक्तातील साखरेची तपासणी, आहाराबाबत मार्गदर्शन, मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांना एक्सरे, सिटी स्कॅन व लॅब तपासणीवर २० टक्के सवलत, ५० टक्के सवलतीमध्ये शिबिरमार्फत उत्तम दर्जाचे चष्मे दिले जाणार आहेत. या शिबिरासाठी चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टर व परिचारिका यांच्याकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Free Health Camp by Yuva Sena