लायन्स क्लब ऑफ गुहागर आयोजित
गुहागर, ता. 26 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी यांच्या मार्फत उद्या दिनांक 27 रोजी सकाळी 10.30 वाजता शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्री देव व्याडेश्वर मंदिराच्या परशुराम सभागृह गुहागर येथे घेण्यात येईल. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रतिभा वराळे, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, चिपळूण लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ला. तुषार गोखले, डॉ दिनेश जोशी उपस्थित राहणार आहेत. Free glasses distribution to school students

लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे अध्यक्ष संतोष वरंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून विविध समाजोयोगी उपक्रम राबविले आहेत. कर्तुत्ववान महिलांचा सन्मान, वृक्षारोपण कार्यक्रम, महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिला यांची आरोग्य तपासणी शिबिर घेतले. समाजातील प्रत्येक घटकाला सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी चष्मा वाटप कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी लायन्स क्लबचे सदस्य ला. सुरेंद्र मर्दा व ला. मनीष खरे यांनी मोफत चष्मा देण्याचा खर्च उचलला आहे. तसेच अल्पोउपरसाठी ला. रवींद्र खरे यांनी आर्थिक सहकार्य केले आहे. Free glasses distribution to school students

तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष संतोष वरंडे, सेक्रेटरी सचिन मुसळे, खजिनदार मनिष खरे तसेच सर्व पदाधिकारी व सभासद यांनी केले आहे. Free glasses distribution to school students