ग्रामीण भागामध्ये केले पिण्याच्या पाण्याचे मोफत वितरण
रत्नागिरी, ता. 26 : वेळ चांगली असो किंवा वाईट कोणत्याही परिस्थितीमध्ये सतत सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारी संस्था म्हणजे रत्नागिरीमधील खंडाळा अर्बन. जयगड पंचक्रोशीमध्ये विविध गावांत खंडाळा अर्बनतर्फे पाणीपुरवठा करण्यात आला. यंदा पाणीटंचाई लवकर झाली आणि टॅंकर धावू लागले. चक्रीवादळामुळे मान्सूनचा पाऊसही उशिरा सुरू झाला. त्यामुळे खंडाळा अर्बनने ट्रकमध्ये पाण्याच्या टाक्या भरून देत पाणीपुरवठा केला. सुदैवाने कालपासून पाऊस सुरू झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. Free distribution of water by Khandala Urban

उन्हाळा आणि कडक पाणीटंचाईमुळे रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई झाली होती. अशा परिस्थितीमध्ये दैनंदिन कामकाज सांभाळून लोकांना पिण्याकरिता पाणी उपलब्ध करून देण्याचा विचार खंडाळा अर्बनच्या सर्वेसर्वा सौ किशोरी सावंत यांच्या मनात आली आणि ही कल्पना सत्यात उतरली. त्याकरिता गरजेच्या ठिकाणी तातडीने आणि घरापासून कितीही दूर असले तरीसुद्धा त्याचे नियोजन केले. कोणताही विलंब न करता सामाजिक जबाबदारी म्हणून खंडाळा अर्बनने स्व- खर्चाने पाण्याचे टँकर पाठवून लोकांचा पाणीप्रश्न कमी करण्यास हातभार लावला. Free distribution of water by Khandala Urban

