युनिटेक कॉम्प्युटरची निवड, खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी योजना
गुहागर, ता. 12 : महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील (Open Category) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (Economical Backward) युवक-युवतींसाठी अमृत योजनेअंतर्गत मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी शृंगारतळीमधील युनिटेक कॉम्पयुटर एज्युकेशन सेंटरची निवड करण्यात आली आहे. Free Computer Training by Amrit
वेगवेगळ्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण, एमपीएससी, युपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळावे यासाठी बार्टी, सारथी सारख्या संस्था काम करतात. या संस्थेद्वारे संबंधित घटकातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाबरोबर मोफत राहण्याची व्यवस्थाही केली जाते. आजपर्यंत अशा संस्थांमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लाभ मिळत नव्हता. अशा विद्यार्थ्यांसाठी 22 ऑगस्ट 2019 रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाने Academy of Maharashtra Research, Upliftment and Training (Amrut ) ‘अमृत’ अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी या स्वायत्त संस्थेची स्थापना केली. राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी, युवक – युवती व इतर उमेदवार इत्यादींचा विकास घडवण्यासाठी ही संस्था काम करते. या घटकांतील विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्य, ज्ञान आणि पाठबळ देऊन त्यांना सक्षम करणे आणि उद्योगाभिमुख रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून स्वावलंबनाला चालना देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. Free Computer Training by Amrit
संगणक क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी अमृत या संस्थेने दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी MKCL मध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला. या करारा अंतर्गत MKCL मार्फत राबविण्यात येणाऱ्या काही निवडक प्रशिक्षण अभ्यासक्रम अमृत योजनेतील विद्यार्थ्यांना मोफत शिकवले जाणार आहेत. Free Computer Training by Amrit
मोफत प्रशिक्षणासाठी MKCL चे अभ्यासक्रम चालणाऱ्या काही कॉम्प्युटर सेंटरची निवड करण्यात आली आहे. गुहागर तालुक्यातील MKCL चे अधिकृत केंद्र युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर, कॅनरा बँकेच्यावर, शृंगारतळी या प्रशिक्षण संस्थेत अमृत योजनेच्या लाभार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी गुहागर तालुक्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर येथे 9657898382 या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा. Free Computer Training by Amrit