दिगंता स्वराज फाउंडेशन यांच्या सामाजिक उपक्रमातून DCCD प्रकल्पा अंतर्गत
गुहागर, ता. 02 : दिगंता स्वराज फाउंडेशन यांच्या सामाजिक उपक्रमातून DCCD प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांना वेंगुर्ला 4 व वेंगुर्ला 7 या काजू रोपांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. यासाठी अंतिम नोंदणी तारीख 10 जून 2025 असून प्रथमेश पोमेंडकर, 9561329260 यांना संपर्क करावा. तसेच झाडांची लागवड केल्या नंतर मार्च मध्ये Audit केले जाईल आणि पहिला टप्पा 18000 रुपये आणि दुसऱ्या वर्षी दुसरा टप्पा 12000 रुपये शेतकऱ्याला दिले जातील. Free cashew seedlings distributed to farmers
अटी व शर्ती
1) जमिनीचे क्षेत्र कमीत कमी एक एकर
2) एक वर्षाचे रोप मोफत
3) 2 वर्षाचे रोप पाहिजे असेल तर वरील रक्कम शेतकऱ्यांनी भरायची
4) लागवड १५ फूट किंवा २१ फुटावर करायची आहे.
5) १५ फुटावर लागवड केल्यास एकरी १०० रोपे आणि २१ फुटावर लागवड केल्यास एकरी ८० रोप दिली जातील.
6) रोपांचे वाटप आपल्या गावच्या पंचक्रोशीत केले जाईल.
7) काजूचे दोन्ही प्रकार शेतकऱ्याला घ्यावे लागतील
8) सातबाऱ्यावरील सहहिस्सेदार यांच्या संमतीची आवश्यकता नाही
लागणारी कागदपत्रे
1) सातबारा
2) आधार कार्ड
3) बँक पासबुक
4) फोटो