गुहागर, ता. 08 : महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी मान्यता प्राप्त लोकशिक्षण मंडळ आबलोली संचालित विद्यार्थी वसतिगृहामध्ये सन २०२३ – २०२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या गरीब, हुशार गरजु व होतकरु मागासवर्गीय विद्यार्थांना मोफत प्रवेश घेण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.चंद्रकांत धोंडू बाईत व अधिक्षक श्री. राकेश रमाकांत साळवी यांनी केले आहे. Free admission to Aabaloli hostel

आरक्षणा प्रमाणे वसतिगृहामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमूक्त जमाती विशेष मागासवर्ग तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थांना मोफत प्रवेश दिला जातो. तरी सदर प्रवर्गातील विद्यार्थांनी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा. सर्व इच्छुक विद्यार्थांनी प्रवेश अर्जासह दोन पासपोर्ट साईज फोटो, मुलकी अधिका-याचे जातीचे प्रमानपत्र, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, विद्यार्थांचा रहिवाशी दाखला, आधारकार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, मागील इयत्ता उत्तीर्ण झाल्याच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत व बॕक पासबुक झेरॉक्स आदी सर्व कागदपत्रांसह पालकांसमवेत येऊन आपला प्रवेश निश्चित करावा. Free admission to Aabaloli hostel
प्रवेश मर्यादित असल्याने प्रवेशासाठी अधिक्षक श्री.राकेश रमाकांत साळवी ( मो. नं. ९४०५०७१५३१ ) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. चंद्रकांत धोंडू बाईत यांनी केले आहे. Free admission to Aabaloli hostel
