• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पेवे सरपंच व ग्रामसेवकावर कडक कारवाई करा

by Mayuresh Patnakar
November 4, 2022
in Guhagar
20 0
0
Fraud by showing Gram Sabha

पेवे मधील याच रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित आहे

40
SHARES
113
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ग्रामस्थांची मागणी, खोटी ग्रामसभा दाखवून फसवणूक केली

गुहागर, ता. 04 : तालुक्यातील पेवे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी खोटी ग्रामसभा दाखवून शासनाची फसवणूक केली आहे. सरपंच आणि ग्रामसेवकांच्या चुकीच्या वागण्यामुळे सात मासिक सभा तहकुब झाल्या आहेत. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. असे पत्र पेवेचे माजी सरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष, पेवे सोसायटीचे संचालक आणि माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे. Fraud by showing Gram Sabha

गुहागर तालुक्यातील पेवे खामशेत मादाली पुल ते कारुळ मार्गे खरेकोंड असा सुमारे 7 किमिचा रस्ता 2020 मध्ये मंजूर झाला होता. हा मार्ग 7 फुट रुंदीचा असल्याने 30 फुट रुंदीसाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जमीन मालकांकडून संमतीपत्र घेणे आवश्यक होते. मात्र पेवेच्या सरपंच सौ. भारती सावरटकर आणि ग्रामसेवक डोलारी यांनी 8 जुलै 2021 ला खोटी ग्रामसभा झाल्याचे दाखवले. या ग्रामसभेत सदर रस्त्यासाठी जमीन मालकांच्या संमंतीची गरज नाही. खासगी जमीन जात नाही. असे खोटे ठराव केले. तसे पत्र खासदार सुनिल तटकरे व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता रत्नागिरी यांना पाठवले. त्यानंतर झालेल्या ग्रामसभेमध्ये रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या ग्रामस्थांनी जमीन देण्यास नकार दिला.  परिणामी सात किलोमिटरचा रस्ताच अडचणीत सापडला आहे. Fraud by showing Gram Sabha

हा सर्व प्रकार पेवेतील मुबीन पेवेकर यांनी माहितीच्या अधिकारात पाठवलेल्या पत्रावरुन उघड झाला. सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावाची फसवणूक केल्याने पेवेचे माजी सरपंच निसार सरगुरो, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुभाष जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य दिनकर पारधी आणि मुबीन पेवेकर व पेवे सोसायटीचे संचालक सुरज हरचिलकर यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, गुहागर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये  खोट्या ग्रामसभेबाबतच्या तक्रारीबरोबर सरपंच ग्रामसभेतील व मासिक सभेतील ठरावांवर सही करत नसल्याने अनेक कामे रद्द झाली आहेत. गेल्या सात मासिक सभा तहकुब झाल्या आहेत. त्यामुळे गावाचे नुकसान होत आहे. या सर्व घटनांची चौकशी करुन सरपंच व ग्रामसेवकावर कडक कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. Fraud by showing Gram Sabha

Tags: Fraud by showing Gram SabhaGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.