गुहागर शहरातील प्रकार; पोलीस स्थानकात तक्रार दाखल
गुहागर, ता. 04 : घरबसल्या सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर बनवून देण्याचा रोजगार मिळवून देतो, असे सांगत गुहागर मधील महिलांची फसवणूक करण्यात आली. जिल्ह्यातील 151 महिलांकडून सभासद फी व कच्चा माल देण्यासाठी गुहागर शहरातील 72 हजार 601 रुपयांचे रक्कम घेऊन फसवणूक केल्याची तक्रार शहरातील महिलांनी गुहागर पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी जळगाव येथील संदीप शरद मुळे (पाटील) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Fraud by claiming to provide employment from home

याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात महिलांनी दिलेल्या माहितीनुसार 10 जून 2022 रोजी गरज फाउंडेशन या नावाने संदीप शरद मुळे याने व्हाट्सअप ग्रुप तयार केला व जिल्ह्यातील महिलांच्या संपर्कात राहून सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर घरबसल्या बनवून महिलांना रोजगार संधी मिळवून देतो असे सांगितले. आणि महिलांचे तालुका पातळीवर कमिटी नेमण्यास सांगितले व या कमिटीच्या माध्यमातून तेथील महिलांचे सभासद फी व इतर रोख रक्कम स्वतःच्या जळगाव येथील बँक खात्यात टाकण्यास सांगितले. सुरुवातीचे काही महिने लवकरच कच्चामाल पाठवून देतो असे सांगत चालढकल केली. काही महिलांनी याबाबत ग्रुपवर विचारणा केली असता संदीप मुळे (पाटील) याने धमकी दिली. तसेच महिलांशी अर्वाच भाषेत संभाषण केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलांनी गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अशाप्रकारे 151 महिलांकडून सभासद फी 351 रुपये त्याप्रमाणे 53001 रूपये तसेच कच्चामाल व मशीन यासाठी 19600 रुपये अशी एकूण 72 हजार 601 रुपयांचे फसवणूक करण्यात आहे. Fraud by claiming to provide employment from home
याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीस करत आहेत. याप्रकरणी मुळे याच्यावर भा. दं. वि. कलम 406, 419, 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Fraud by claiming to provide employment from home

