गुहागर,ता. 14 : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशील कुमार मोदी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते कॅन्सरशी लढत होते. त्यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू होते. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी एक्सवर त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. सुशील कुमार मोदी यांच्या निधनामुळं बिहारमधील भाजपचा चेहरा हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. Former Deputy Chief Minister Modi is No More
५ जानेवारी १९५२ रोजी पाटणा येथे जन्मलेल्या मोदी यांचे शिक्षण त्याच शहरात झाले. मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. १९९० साली ते सक्रीय राजकारणात आले. १९९० १९९५ आणि २००० साली ते बिहार विधानसभेवर निवडूण गेले. २००४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भागलपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र एका वर्षातच त्यांनी राजीनामा दिला आणि पुन्हा बिहारच्या राजकारणात परतले. २००५ ते २०१३ या काळात ते नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. Former Deputy Chief Minister Modi is No More
१९९६ ते २००४ पर्यंत ते विधानसभेत विरोधीपक्ष नेते होते. मोदी यांनी पाटणा उच्च न्यायालयात लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर चारा घोटाळा समोर आला. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी एक्सवर पोस्ट करून सुशील कुमार मोदी यांच्या निधनाची माहिती दिली आणि दु:खही व्यक्त केले. सम्राट चौधरी यांनी म्हटले की, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी राज्यसभा खासदार श्री सुशील कुमार मोदी यांना त्यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली. बिहार भाजपाचे हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. Former Deputy Chief Minister Modi is No More