वनविभागाच्या वतीने वड-पिंपळाच्या 250 झाडांची लागवड
रत्नागिरी, ता. 03 : महाराष्ट्राचे वनमंत्री सन्मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुहागर तालुका वनविभागाच्या वतीने वड आणि पिंपळाच्या 250 झाडांची वृक्षारोपण करण्यात आले. गुहागर तालुक्यात चिखली, तवसाळ खुर्द व अन्य ठिकाणी ही लागवड करण्यात आली. Forest Minister’s birthday tree plantation




यावेळी चिखली गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ भगवान भाई कदम, ग्रामपंचायत सदस्य निर्भय दळवी, सौ.साळवी, महेश साळवी, बाबू कदम, दीपक कदम, कमलेश कदम तर तवसाळ खुर्द येथील वृक्षारोपणावेळी सरपंच सौ प्रियांका सुर्वे, भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, किरण गडदे, अमोल सुर्वे, कामिल नरवणकर, प्रकाश सुर्वे, उदय शीरधनकर, कृषी सखी स्मिता शिरधनकर, चंद्रकांत निवाते, कैलास मोहीते, ग्रामविकास अधिकारी श्री महेंद्र निमकर याचबरोबर वनपाल गुहागर श्री संतोष परशेटे, वनरक्षक श्री अरविंद मांडवकर, वनरक्षक श्री संजय दुंडगे, कासव मित्र ऋषिकेश पालकर आदी उपस्थित होते. Forest Minister’s birthday tree plantation

