गुहागर, ता. 10 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर येथे वनभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, प्रश्नमंजुषा असे उपक्रम राबविण्यात आले. तसेच विविध खेळ, अंताक्षरी, कागदापासून नवनवीन गोष्टी तयार करून दाखवण्यात आल्या. शेवटी विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केला. Forest food program at Veldur Navanagar School


वनभोजनाला शाळेचे मुख्याध्यापक डॉ श्री मनोज पाटील, अंजली मुद्दामवार, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला उपस्थित होत्या. सर्व विद्यार्थी व पालक वर्गाने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली. शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्या उपस्थित होत्या. भोजन बनविण्यासाछी शिल्पा कोळथरकर, सुरक्षा रोहिलकर, रीना खडपकर, विद्या रोहिलकर, अर्चना रोहिलकर, संचिता पालशेतकर, दीपिका रोहिलकर, कार्तिकी दाभोळकर, प्रिया रोहिलकर, संध्या पालशेतकर, दिपाली वरवटकर, अंकिता कोळथरकर, देवयानी कोळथरकर, विजया पालशेतकर, मृदुला जांभारकर, विशाखा नाटेकर, सुवर्णा कोळथरकर यांनी मदत केली. Forest food program at Veldur Navanagar School