आ. भास्करशेठ जाधव व रा. प. गुहागर आगार यांना निवेदन
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 09 : तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे. यासाठी शाळेच्या वेळेनुसार विद्यार्थ्यांना शाळेत येता यावे वेळेत घरी जाता यावे . यासाठी आम. भास्करशेठ जाधव यांना व रा. प. गुहागर आगार यांना लोकशिक्षण मंडळ आबलोली संचालित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने एस.टी. बस सेवा सुरु करण्यासाठी निवेदन देण्यात आले. For students ST. Bus service should start


आबलोली येथे ग्रामीण भागातून, अनेक गावातून विद्यार्थी येत असतात. या शाळेची वेळ सकाळी १०:१० वाजता ते सायंकाळी ४:१० वाजता अशी असून, शाळा सुटल्यावर ब-याच विद्यार्थ्यांना सायंकाळी ६:०० ते ६:३० पर्यंत आबलोलीतच थांबावे लागते. पर्यायाने त्यांचा रोजचा साधारणपणे दोन तासांचा वेळ वाया जातो. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत येण्यासाठी सकाळी ८:०० गुहागर मधून पालशेतमार्गे तवसाळ व्हाया बाबरवाडी व तांबडवाडी मार्गे पडवे, काताळे, कुडली, सडेजांभारी, मासू, आबलोली व घरी जाण्यासाठी दुपारी साधारण ३:०० वाजता गुहागर आगारातून एस. टी. बस. सोडण्यात यावी. सदरील एस. टी. बस सायंकाळी ४:१० वाजता आबलोली मार्गे मासू, सडेजांभारी, कुडली, पडवे, तवसाळ या मार्गावरून व्हाया बाबरवाडी व तांबडवाडी पर्यंत जाऊन परत गुहागर येथे जाईल. For students ST. Bus service should start


तरी हि सेवा तात्काळ सुरु झाल्यास शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या आबलोली परिसरातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल व त्यांच्या वेळेत व पैशात बचत होईल आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान थांबेल. तरी आपण तातडीने या विषयात लक्ष घालून या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी दिनांक १६ जून पासून एस. टी. बस सेवा सुरु करण्यासाठी गुहागरचे कार्यसम्राट आमदार भास्करशेठ जाधव यांना व रा. प. गुहागर आगार व्यवस्थापक चव्हाण यांना लोकशिक्षण मंडळ आबलोली संचालित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली यांचे वतीने दिनेश नेटके, अहिरे, राजेंद्र साळवी, सचिनशेठ बाईत, विलास गुरव, व्हनमाने यांनी नुकतेच निवेदन दिले आहे. For students ST. Bus service should start

