किड्स लीपे इंग्लिश मीडियम प्ले स्कूलचे आयोजन
गुहागर, ता. 31 : विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे, उद्योग जगताची ओळख व्हावी, यासाठी पालशेत येथे खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा महोत्सव किड्स लीपे इंग्लिश मीडियम प्ले स्कूल पालशेत येथे उत्साहात पार पडला. या खाद्य महोत्सवाला सर्वांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. Food Festival in Palshet
किड्स लीपे इंग्लिश मीडियम प्ले स्कूल पालशेत येथील खाद्य महोत्सवांमध्ये विद्यार्थ्यांनी १५ स्टॉल उभारले होते. यामध्ये घरगुती पद्धतीचे पुरणपोळी, गुलाब जामुन, इडली, मोदक, मेंदू वडा, सॅंडविच, शेवपुरी, पाणीपुरी, मोनोको पिझ्झा,आधी रुचकर पदार्थ या स्टॉलवर ठेवण्यात आले होते. यांचे दर देखील माफक असेच ठेवले होते. Food Festival in Palshet

या खाद्य महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून पालशेत गावचे प्रतिष्ठित नागरिक अशोक चव्हाण, विलास चव्हाण, पालक प्रतिनिधी स्वाती गडदे, रमेश साळवी, कार्याध्यक्ष आसावरी ठाकूर_ वराडकर, शिक्षक पूजा ठाकूर, श्रद्धा चव्हाण, रुचिका साळवी, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. खाद्य महोत्सवाला सर्वांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला व विद्यार्थ्यांचे कौतूकही करण्यात आले. Food Festival in Palshet

