• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उमराठ येथे दिवंगत सैनिकांच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण

by Mayuresh Patnakar
January 28, 2023
in Guhagar
97 1
0
Flag Hoisting by Soldier's Wife at Umrath
190
SHARES
544
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 28 : ग्रामपंचायत उमराठ येथे २६ जानेवारी २०२३ रोजी एक आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दिवंगत माजी सैनिकांच्या ९५ वर्षीय पत्नीला प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित करून त्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. यापुर्वी ग्रामपंचायत उमराठ कार्यालयात १३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ या दरम्याने झालेल्या देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत जनजागृती करताना विधवा महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. Flag Hoisting by Soldier’s Wife at Umrath

प्रजासत्ताक दिनी उमराठ गावचे दिवंगत माजी सैनिक नारायण रामचंद्र पवार यांच्या ९५ वर्षीय पत्नी श्रीमती चंद्रभागा नारायण पवार यांच्या शुभ हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम निमंत्रित प्रमुख पाहुण्या श्रीमती चंद्रभागा नारायण पवार यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते सरपंचांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. त्या नंतर जि.प. शाळा उमराठ नं.१ येथे मुख्याध्यापक प्रदिप रामाणे सर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून तिरंगा फडकविण्यात आला. Flag Hoisting by Soldier’s Wife at Umrath

Flag Hoisting by Soldier's Wife at Umrath

यावेळी सरपंच जनार्दन आंबेकर, मुख्याध्यापक रामाणे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वसंतराव कदम, माजी अध्यक्ष संदीप गोरिवले, अनिल पवार, नामदेव पवार तसेच विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिना निमित्त यथोचित भाषणे व मार्गदर्शन केले. तर पोलीस पाटील वासंती आंबेकर हिने राष्ट्रभक्तीपर गाणे गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायत आणि व्यायामाद्वारे उत्कृष्ट विविध मनोऱ्यांचे प्रात्यक्षिक करून तिरंग्याला मानवंदना दिली व उपस्थितांचे मनोरंजन केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी सुद्धा विद्यार्थी बालमित्रांचे भरभरून कौतुक केले. Flag Hoisting by Soldier’s Wife at Umrath

Flag Hoisting by Soldier's Wife at Umrath

यावेळी सरपंच जनार्दन आंबेकर, ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे, उपसरपंच सुरज घाडे, सदस्या अर्पिता गावणंग, समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे, आरोग्य सेवक अजय हळये, तंटामुक्ती समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष वसंतराव कदम, माजी अध्यक्ष संदीप गोरिवले, पोलीस पाटील वासंती आंबेकर, ग्रामस्थ अनिल पवार, सुरेश पवार, प्रकाश पवार, नामदेव पवार, महेश गोरिवले, विनायक कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कदम, अशोक जालगावकर, देवेंद्र जालगावकर, अविनाश कदम, सनी गोरिवले, अंगणवाडी सेविका वर्षा पवार, समृद्धी गोरिवले, आशा  सेविका वर्षा गावणंग, अंगणवाडी वाडी सेविका राधा आंबेकर, वर्षा पवार, अंगणवाडी मदतनीस निलम जोशी, समृद्धी गोरिवले आणि  बहुसंख्य ग्रामस्थ आणि महिला भगिनी, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप रामाणे, पदवीधर शिक्षक श्री अनिल अवेरे, उपशिक्षिका सौ. प्रियांका कीर, सौ. सायली पालशेतकर मॅडम तसेच विद्यार्थी आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी नितीन गावणंग व प्रशांत कदम इत्यादी मंडळी उपस्थित होते. Flag Hoisting by Soldier’s Wife at Umrath

Tags: Flag Hoisting by Soldier's Wife at UmrathGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet48
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.