गुहागर, ता. 15 : देशाचा आज स्वातंत्र्य दिन संपन्न झाला. यानिमित्ताने कोतळूक ग्रामपंचायत कार्यालय येथे देशाच्या सीमेवर ४० वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालेले कोतळूक गावचे सुपुत्र माजी सैनिक बाबाजी शिगवण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच कोतळूक येथील ना. गोपाळकृष्ण गोखले माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद कोतळूक शाळा नंबर १ मध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्य गीत, समुह गीत सादर केली. Flag Hoisting by Ex-Servicemen at Kotaluk


यावेळी सरपंच सौ. प्रगती मोहिते, उपसरपंच शितल गोरिवले, ग्रामपंचायत सदस्य महात्मा गांधी तंटामुक्त समिती कोतळूक अध्यक्ष सचिन ओक, सुनिल आगिवले, लक्ष्मण वरकर, सौ मनाली मोहित, मानसी पवार, समीक्षा वाघे, आसावरी बाधावटे, माजी सभापती विलास वाघे, पंचायत समिती माजी सदस्य लक्ष्मण शिगवण, सोसायटी चेअरमन पांडुरंग कावणकर, व्हा चेअरमन अनंत चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिल भेकरे, माजी सरपंच सुरेश गोरिवले, पोलिस पाटील संचिता मोहिते, अनुजा चव्हाण, गावामध्ये विविध पदावर कार्यरत असलेले पदाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक ग्रामस्थ, युवक बहुसंख्येने उपस्थित होते. Flag Hoisting by Ex-Servicemen at Kotaluk

