• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्रजासत्ताक दिनी गोपाळगडावर ध्वजारोहण

by Guhagar News
January 27, 2024
in Guhagar
73 1
1
Flag Hoisting at Gopalgad on Republic Day

गोपाळगड

143
SHARES
409
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शिवराय मावळे प्रतिष्ठान,आबलोली तर्फे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 27 : अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांचे वतीने ३५० वा  “शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा” २६ जानेवारी २०२४ रोजी  सर्व शिवप्रेमी, दुर्गप्रेमी यांनी एकाच दिवशी, एकसंघपणे ३५० किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि भगवा, तिरंगा ध्वज फडकविण्याची जबाबदारी शिवप्रेमींनी घेतली होती. रत्नागिरी जिल्हात एकूण २६ किल्ल्यांवर हा उपक्रम पार पडला. यामध्ये चिपळूण-गुहागर विभागात शिवराय मावळे प्रतिष्ठान, आबलोली यांनी अंजनवेल मधील गोपाळगड किल्यावर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि भगवा, तिरंगा ध्वजारोहन यशस्वीपणे पार पाडला. Flag Hoisting at Gopalgad on Republic Day

यावेळी अंजनवेल ग्रामपंचायत सरपंच  सौ. सोनल मोरे  यांच्या शुभहस्ते राष्ट्रीयध्वज फडकविण्यात आला त्यानंतर सर्वांनी ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगान गायले. प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष  श्री. नितेश सुरेश पांचाळ यांच्या शुभहस्ते भगवा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर सर्व मान्यवर, प्रतिष्ठान सदस्य यांच्या उपस्थितीत श्रीमंत योगी श्री. छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून सर्वजन नतमस्तक झाले. उपस्थितांच्यासमोर गडकिल्ल्यांचे पावित्र्य अबाधित ठेवेन, स्वराज्याचा सोनेरी इतिहास समजून घेईन, किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचा कचरा करणार नाही, अशी  शिव प्रतिज्ञा घेण्यात आली. Flag Hoisting at Gopalgad on Republic Day

या उपक्रमासाठी अंजनवेल ग्रामपंचायत यांची उपस्थिती व सहकार्यासाठी सरपंच सौ. सोनल मोरे मॅडम यांचे प्रतिष्ठान वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपस्थित सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सरपंच सोनल मोरे यांनी मनोगतामधून प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. संस्थापक अध्यक्ष नितेश पांचाळ  यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास प्रकट केला, आधुनिक जगात जीवन जगत असताना आपले विचार कसे असावे व कर्तव्य काय आहे हे समजावून सांगितले व  प्रतिष्ठानचे शैक्षणिक, सामाजिक कार्य प्रकट केले. आणि शेवटी  सर्वांचे आभार मानून उपक्रमाची सांगता केली. Flag Hoisting at Gopalgad on Republic Day

यावेळी अंजनवेल ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सोनल मोरे, सदस्य नंदकुमार घेतले, योगेश धामणस्कर, वहिदा खतीफ, सानिका नरवणकर, सैतावडेकर मॅडम, किल्ला जागा मालक ताबिश मणियार, प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री.नितेश सुरेश पांचाळ, शुभम मनोहर पांचाळ, प्रथमेश रमेश पांचाळ, सचिन घाणेकर, ऋषीकेश रविंद्र पांचाळ, विनीत सुभाष पांचाळ, प्रणव प्रकाश झगडे, सुबोध विलास जाधव, विक्रम विठ्ठल घाणेकर, शुभम साळवी, पंकज कदम आदी शिवराय मावळे प्रतिष्ठान, आबलोली या प्रतिष्ठानचे मावळे व शिवप्रेमी उपस्थित होते. Flag Hoisting at Gopalgad on Republic Day

Tags: Flag Hoisting at Gopalgad on Republic DayGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share57SendTweet36
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.