पाटपन्हाळे भेकरेवाडी येथे दि. २६ ते २८ फेब्रुवारी रोजी पर्यंत
गुहागर, ता. 24 : तालुक्यातील पाटपन्हाळे भेकरेवाडी येथील जागृती विकास मंडळ (रजि.) यांच्या वतीने नवसाला पावणारी कुलस्वामिनी श्री सालबाई सोमया देवतेचा पंचवार्षिक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा महोत्सव श्री सालबाई सोमया देवता मंदिर येथे सोमवार दि. २६ ते बुधवार दि. २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. Five-yearly festival of Patpanhale village deity
यानिमित्त सोमवार दि. २६ रोजी सकाळी १० वा. देवीचे आगमन व मिरवणुक, दुपारी १ वा. देवीचा महाप्रसाद, सायंकाळी ६ वा. सांज आरती (काकडा आरती), रात्री ७.३० वा. मंडळाचे सुस्वर भजन, रात्री ८.३० वा. मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रात्री ९ वा. मान्यवरांचा व जेष्ठ सभासदांचा सत्कार, रात्री १० वा.विशेष मनोरंजनाचा कार्यक्रम वेसावकर आणि मंडळी निर्मित “दर्याचा राजा” अरुण पेदे निर्मित पारंपारिक कोळी गीते व संस्कृती जपणारी धमाल कलाकृती, नवीन रुपात आणि नवीन ढगांत, दि. २७ रोजी दुपारी १ वा. देवीचा महाप्रसाद, दुपारी ३ वा. कार्यक्रमाची सांगता. दि. २८ रोजी दुपारी २ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी ३ वा. महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, सायं. ४ वा. लक्की ड्रॉ सोडत, सायं. ७ वा. मंडळाचे सुस्वर भजन, रात्री ८ वा. श्री सत्यनारायणाचा महाप्रसाद रात्री १० वा. मनोरंजनाचा कार्यक्रम (बहुरंगी नमन) आयोजित करण्यात आला आहे. Five-yearly festival of Patpanhale village deity
स्मरणिका कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, शिवसेना गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत, पाटपन्हाळे ग्रामपंचायत सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे, मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, ग्रामपंचायत माजी सरपंच संजय पवार, पाटपन्हाळे पोलीस पाटील सत्यप्रकाश चव्हाण, पाटपन्हाळे ग्राम विकास मंडळ अध्यक्ष सुधाकर चव्हाण आदि उपस्थित राहणार आहेत. Five-yearly festival of Patpanhale village deity
तरी या कार्यक्रमाला सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव कमिटी अध्यक्ष गोविंद भेकरे, ग्रामस्थ कमिटी अध्यक्ष वसंत भेकरे, मुंबई कमिटी अध्यक्ष निलेश भेकरे महिला कार्यकारणी अध्यक्ष रंजीता भेकरे यांनी केले आहे. Five-yearly festival of Patpanhale village deity