निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनतर्फे आयोजन
रत्नागिरी, ता. 17 : निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनचा २२ डिसेंबरला रत्नागिरीत पंचवार्षिक स्नेहमेळावा बोर्डिंग रोड येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित केला आहे. सकाळी १० ते ३ या वेळेत मेळावा होणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय समितीचे अध्यक्ष व राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलिस महासंचालक धनंजय कमलाकर (मुंबई) करणार आहेत. जास्तीत जास्त सभासदांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशनचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व निवृत्त पोलीस अधिकारी वसंत चव्हाण यांनी केले आहे. Five Year Reunion at Ratnagiri
रत्नागिरी जिल्ह्यात ६५२ सभासद असून या सर्वांना निमंत्रित केले आहे. केंद्रीय समितीचे अध्यक्ष व राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलिस महासंचालक धनंजय कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होत आहे. या वेळी कार्यक्रमातील सत्रांचे अध्यक्षस्थान अॅड. सिताराम न्यायनिर्गुणे भूषवतील. मुख्य अतिथी म्हणून कार्याध्यक्ष सुखानंद साब्दे, जनसंपर्क अधिकारी श्रीराम गोरे, विशेष अतिथी म्हणून उद्योजक आर. डी. उर्फ अण्णा सामंत, मराठा महासंघाचे अध्यक्ष केशवराव इंदुलकर, ज्येष्ठ डॉक्टर अलिमियॉं परकार, इब्राहिम अॅंड सन्सचे संचालक श्री. इब्राहिम, महेंद्रसिंग, श्री. हेळेकर, राजन मलुष्टे उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालन कार्याध्यक्ष अर्जुन राणे (सिंधुदुर्ग) करणार आहेत. मेळाव्यात जनसंपर्क अधिकारी श्रीराम गोरे हे संघटनेची माहिती व फायदे काय आहेत ते सांगणार आहेत. मेळाव्याच्या वेळेस मंजूर झालेल्या मागण्या, त्याची माहिती व महाराष्ट्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सवलत व इतर माहितीचा उहापोह केंद्रीय समितीचे अधिकारी करणार आहेत. Five Year Reunion at Ratnagiri
मेळाव्याला पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधीक्षक नीलेश माईनकर, उपविभागीय पोलिस अधीक्षक भागोजी आवटी, पोलिस उपअधीक्षक राधिका फडके, रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर, रत्नागिरी ग्रामीण पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव, पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे आणि जयगड सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पवार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच संघटनेचे सहअध्यक्ष अॅड. सिताराम न्यायनिर्गुणे, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री. गवस, नवी मुंबईंचे अध्यक्ष विनोद चव्हाण, मुख्य संघटक अरविंद सावंत, सल्लागार विकास गावडे, बृहन्मुंबईचे मुख्य सचिव विजय चव्हाण, रायगडचे अध्यक्ष प्रदीप माने, रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद नलावडे आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. Five Year Reunion at Ratnagiri
हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष वसंतराव चव्हाण, मुख्य संघटक अरविंद सावंत, सल्लागार विकास गावडे, सचिव शिरीष सासणे, उपाध्यक्ष प्रमोद नलावडे मेहनत घेत आहेत. जनतेच्या सुरक्षिततेसाठी पोलिस, पण पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी कोण याकरिता जास्तीत जास्त निवृत्त पोलिसांनी या असोसिएशनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन वसंतराव चव्हाण यांनी केले आहे. Five Year Reunion at Ratnagiri