• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

फिट रत्नागिरी हॅपी मॅरेथॉन 2023

by Manoj Bavdhankar
February 18, 2023
in Ratnagiri
84 1
0
Fit Ratnagiri Happy Marathon 2023
166
SHARES
473
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नोंदणी केलेल्या स्पर्धकांनी जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा

रत्नागिरी, दि. 18 : फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉन 2023 स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या धावपटूंना टि-शर्ट आणि बिल्ला नंबरसाठी जिल्हा क्रीडा कार्यालय येथे शनिवार दि.18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 ते 6.00 या वेळेत वितरीत केले जाणार आहेत. Fit Ratnagiri Happy Marathon 2023

उदयोग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी स्टेडीअम येथे फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉन 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विविध वयोगटात आणि विविध अंतरासाठी दोन हजार  नागरीकांनी सहभाग नोंदवला आहे.  सहभाग नोंदवणाऱ्या धावपटूंना टि-शर्ट आणि बिल्ला नंबर जिल्हा क्रीडा कार्यालय येथे शनिवार 18 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11.00 ते 6.00 या वेळेत वितरीत केले जाणार आहेत. Fit Ratnagiri Happy Marathon 2023

स्पर्धेसाठी सर्व धावपटूंनी रविवार 19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 5.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम रत्नागिरी येथे उपस्थित राहावे. स्पर्धेला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम रत्नागिरी येथून प्रारंभ होणार आहे. सकाळी 5.00 वाजता खेळाडूंच्या वॉर्मअपसाठी झुंबा डांसचे आयोजन करण्यात आले असून सकाळी 5.45 वाजता 21 कि.मी. स्पर्धेस प्रारंभ होईल. त्यानंतर पुढील सर्व स्पर्धा 20 मिनिटांच्या अंतराने सुरु होतील. 21 कि.मी. स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम रत्नागिरी येथून प्रारंभ होऊन जयस्तंभ मार्गे पावस रोड येथील मुकूल माधव शाळेजवळून परत फिरेल आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम येथे पूर्ण होईल.  Fit Ratnagiri Happy Marathon 2023      

10 कि.मी. स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम रत्नागिरी येथून प्रारंभ होऊन जयस्तंभ मार्गे पावस रोड झरीविनायक मंदीर येथून परत फिरेल आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम येथे पूर्ण होईल.तर 5 कि.मी. स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम रत्नागिरी येथून प्रारंभ होऊन जयस्तंभ मार्गे भाटये पुलावरुन परत फिरेल आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम येथे पूर्ण होईल. Fit Ratnagiri Happy Marathon 2023

स्पर्धेचे नियोजन अंतिम टप्प्यात असून धावपटूंसाठी प्रत्येक अनेक टप्प्यांवर उत्साहवर्धक पेय, खाद्यपदार्थ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  धावपटूंच्या आरोग्याची काळजी म्हणून तीन सुसज्ज अँम्ब्युलन्स तसेच फिरते पायलट पथक नियुक्त करण्यात आले आहे. पोलीस वाहतूक विभागाच्या वतीने धावपटूना कोणताही अडथळा होवू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गटातील तीन याप्रमाणे म्हणजे 36 विजेत्यांना रोख रक्कम, पदकं आणि प्राविण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी झालेल्या सर्व धावपटूंना सहभाग प्रमाणपत्र वितरीत करण्यात येतील, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. Fit Ratnagiri Happy Marathon 2023

Tags: Fit Ratnagiri Happy Marathon 2023GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share66SendTweet42
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.