• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉन 2023 चे आयोजन

by Ganesh Dhanawade
February 14, 2023
in Ratnagiri
202 2
0
Fit Ratnagiri Happy Marathon 2023
397
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दि.19 रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम, रत्नागिरी येथून प्रारंभ

रत्नागिरी, ता. 14 : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने रविवार, दि.19 फेब्रुवारी, 2023 रोजी “फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉन 2023” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेस छत्रपती शिवाजी स्टेडियम, रत्नागिरी येथून प्रारंभ होणार आहे. Fit Ratnagiri Happy Marathon 2023

बुधवार दि.15 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी https://forms.gle/DrmsogAsGMirai9EA या लिंकवर करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व धावपटूना टी शर्ट, सहभाग प्रमाणपत्र तसेच प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम, प्रावीण्य प्रमाणपत्र व पदक देण्यात येणार आहे. Fit Ratnagiri Happy Marathon 2023

ही स्पर्धा एकूण 10 गटात आयोजित करण्यात आलेली असून यामध्ये 14 वर्षाखालील मुले व मुली, 18 वर्षाखालील मुले व मुली आणि पुरुष, महिला असे गट करण्यात येणार आहेत. 5 किमी., 10 किमी. आणि 21 किमी. अशा अंतराची ही स्पर्धा आहे. 14 व 18 वर्षाखालील मुले व मुली गटासाठी  5 किमी अंतर असून पुरुष व महिला गटातील धावपटू 5 किमी, 10 किमी किंवा 21 किमी या एका स्पर्धेत सहभागी होवू शकतात. Fit Ratnagiri Happy Marathon 2023

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

रविवार, दि.19 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 5 वाजता सर्व धावपटूनी छत्रपती शिवाजी स्टेडियम, रत्नागिरी येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे. सर्वप्रथम झुम्बा डान्स, त्यानंतर 5. 45 वाजता 21 किमीच्या  स्पर्धेला प्रारंभ होईल. 6.05 मिनिटांनी 10 किमी ची स्पर्धा सुरु होईल. 6.20 वाजता 5 किमी स्पर्धेस प्रारंभ होईल. 5 किमी गटासाठी धावमार्ग छत्रपती ‍शिवाजी स्टेडियम ते भाटये पूल व परत असा मार्ग असून 10 किमी गटासाठी छत्रपती ‍शिवाजी स्टेडियम ते झरी विनायक मंदिर ते परत असा धावमार्ग आहे. तर 21 किमी गटासाठी छत्रपती ‍शिवाजी स्टेडियम ते मुकुल माधव विदयालय व परत असा मार्ग आहे. Fit Ratnagiri Happy Marathon 2023

तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. Fit Ratnagiri Happy Marathon 2023

Tags: Fit Ratnagiri Happy Marathon 2023GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share159SendTweet99
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.