• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भोगवे बीचवर रंगणार गळ मासेमारीची स्पर्धा

by Guhagar News
October 15, 2024
in Sports
143 1
0
Fishing competition at Bhogwe Beach
281
SHARES
802
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सर्वात मोठ्या माशाच्या वजनावरुन ठरणार प्रथम विजेता

संदेश कदम, आबलोली
सिंधुदुर्ग, ता. 15 : जिल्ह्यातील सर्वात स्वच्छ, सुंदर आणि शांत समुद्र म्हणून नावलौकिक मिळवलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे बीचवर गळ (गरी) मासेमारी स्पर्धा रंगणार आहे. ग्रामस्थांच्या वतीने रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत याबाबतचे नियोजन असून प्रथम क्रमांक विजेत्याला सर्वात मोठ्या माशाच्या वजनावरुन १५०००/- रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. Fishing competition at Bhogwe Beach

हि स्पर्धा भोगवे कोलवेल ग्रामस्थांच्या वतीने सलग चौथ्या वर्षी घेण्यात येत असून गळ मासेमारी स्पर्धेसाठी प्रवेश फी १०००/- रुपये ठेवण्यात आली असून हि स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. नावनोंदणीसाठी दिनांक १५ ऑक्टोबर हि या स्पर्धेची अंतिम तारीख आहे. तरी प्रथम नोंदणी केलेल्या १५० जणांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. Fishing competition at Bhogwe Beach

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीला एकच तंगूस (साव) वापरण्याची परवानगी असून एका तंगूसला जास्त गळ (ग-या) जोडता येणार आहेत. लांबारी लाठारी (काठी) वापरुन तसेच आधुनिक रिळ असलेले गळ वापरुन किनाऱ्यावर अथवा खडकावर उभे राहून गळाने मासे पकडण्याची परवानगी आहे. तसेच स्पर्धकाला समुद्र किनारी तीन फूट खोली पलीकडे जाण्याची परवानगी नाही. मासे पकडताना मद्यपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धकाने कोणतेही साहस न करता स्वतः ची सुरक्षा राखायची आहे शिस्त आणि सुरक्षितता याला प्रथम प्राधान्य असून स्पर्धेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. Fishing competition at Bhogwe Beach

स्पर्धेतील विजेता ठरविताना एकुण किती मासे पकडले यावरूनच ठरवीला जाणार असून जास्त वजनाचा मासा पकडणा-याला प्रथम  क्रमांकाला पंधरा हजार रुपये पारितोषिक मिळणार आहे. व्दितीय क्रमांकास पारितोषिक दहा हजार रुपये व तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये पारितोषिक असणार आहे. तरी स्पर्धकांनी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी सुरज सामंत मो. नं. ८४४६२५२१८२, शेखर सामंत मो. नं. ९४२१२६१८१९ यांचेशी मोबाईलवर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे. Fishing competition at Bhogwe Beach

Tags: Fishing competition at Bhogwe BeachGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share112SendTweet70
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.