जीवीतहानी नाही, 5 लाखांचे नुकसान
गुहागर, ता. 21 : अंजनवेल येथील समुद्रात नांगरुन ठेवलेल्या बोटीला रात्री अचानक आग लागली. बोटीतील सर्व खलाशी घरी गेले असल्याने जीवीतहानी झाली नाही. .मात्र या आगीत बोटीवरील जाळी व अन्य साहित्य जळून खाक झाले. यामध्ये बोटमालकाचे सुमारे 4 लाखाचे नुकसान झाले आहे. Fishing boat fire in Anjanvel
सध्या सामान्य मच्छीमारांना मच्छी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मच्छीमारी व्यवसायात अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या बोटीमुळे पारंपरिक मच्छीमारांना मच्छी मिळत नाही. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे हक्कांच्या हंगामातही मच्छी मिळत नाही. वादळांची संख्या वाढल्याने सावधानतेचा इशारा मिळाल्यावर व्यवसायाला सुट्टी मिळते. पण खलाशांचे पगार, दाणापाण्यासाठीचा खर्च कमी होत नाही. विविध कारणांनी पारंपरिक मच्छीमार गांजला आहे. अशावेळी होणारा अपघात, येणारी आपत्ती त्यातून होणारे नुकसान मच्छीमारांसाठी दुष्काळात तेरावा महिना ठरते. Fishing boat fire in Anjanvel


अंजनवेल भोईवाडी येथील रंजना कृष्णा पडवळ यांच्या मालकीची छोटी मच्छीमार यांत्रिकी नौका घेवून खलाशी मंगळवारी संध्याकाळी मच्छीमारीला गेले होते. रात्री 3 च्या सुमारास ते अंजनवेल बंदरात आले. दिवस रात्र मेहनत करुन मिळालेली मच्छी बंदरावर उतरवली. नौकेतील सामानाची बांधाबांध केली खलाशी घरी निघुन गेले. सकाळी बातमी आली समुद्रात नांगरुन ठेवलेल्या बोटीला आग लागली होती. सर्वांच्या लक्षात आले ही बोट पडवळ यांची आहे. तातडीने सर्वांनी जळत असलेल्या नौकेकडे धाव घेतली. आग विझवून बोट किनाऱ्यावर आणली. सर्वांनी बोटीची पहाणी केली त्यावेळी बोटीतील जाळी, इंजिन, लाकडी फळ्या व खांब, ट्रे, कॅन आदी सर्व गोष्टी जळून गेलेल्या होत्या. फायबरची बोटही अनेक ठिकाणी जळली होती. सुमारे 5 ते 6 लाख अशी या नुकसानीची अंदाजित किंमत आहे. मात्र तेथील मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार फायबरची बोटीला इतक्या ठिकाणी जळून भोके पडली आहेत की नौका दुरुस्त करुन पुन्हा वापरणे धोकादायक आहे. त्यामुळे रंजना पडवळ यांना पुन्हा हा व्यवसाय उभा करण्यासाठी 10 ते 12 लाख रुपयांची व्यवस्था करावी लागणार आहे. Fishing boat fire in Anjanvel