• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 April 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बेकायदेशीर मासेविक्री करणार्‍यांवर गुन्हा दाखल करा

by Guhagar News
April 18, 2026
in Guhagar
88 1
0
Fish sales at Shringartali market
172
SHARES
492
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

 पाटपन्हाळे ग्रा.पं.ची पोलिसांकडे मागणी

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतसमोर मच्छीविक्री करण्यासाठी सुसज्ज मार्केट उभारण्यात आले असूनही शृंगारतळी मुख्य बाजारपेठेत ग्रामपंचायत प्रशासनाचे नियम झुगारून रस्त्यावर बसून मच्छीविक्री करत आहेत.  या महिलांना ग्रामपंचायतने वेळोवेळी सूचना देऊन आणि कारवाई करूनही त्याला न जुमानता दररोज वर्दळीच्या ठिकाणी उघड्यावर मच्छीविक्री करत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली असून ग्रामपंचायतीने तसे पत्र गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना दिले आहे. Fish sales at Shringartali market

या पत्रात म्हटले आहे की, या बेकायदेशीर मच्छीविक्रेत्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे शिवाय या मच्छीविक्री करणार्‍या महिलांमुळे पादचारी आणि व्यापारांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी ग्रामपंचायत कर्मचारी गेले होते व संबंधित महिलांना ग्रामपंचायतसमोर असलेल्या मच्छीमार्केटमध्ये जाऊन बसण्याच्या सूचना दिल्या मात्र संबधित महिलांनी तिथे जाण्यास स्पष्ट नकार दिला आणि सार्वजनिक ठिकाणीच मच्छी विक्री सुरु ठेवली आहे. त्या ठिकाणी मासे साफ करून टाकलेली खवले आणि सांडलेल्या घाण पाण्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरत आहे. ग्रामपंचायतीने वारंवार सूचना देऊन सुद्धा मच्छीविक्री करणार्‍या महिला ग्रामपंचायत प्रशासनाला जुमानत नसल्याने आपण आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करून या महिलांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. Fish sales at Shringartali market

Tags: Fish sales at Shringartali marketGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share69SendTweet43
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.