गुहागर, ता. 27 : दि. 24 जून रोजी संध्याकाळी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात प्रथमच एकाच वेळी बारा पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. चिपळूण मधील बारा नवोदित कवयित्रींच्या चतुष्पदी संग्रहांचा हानअनोखा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. First time publication of twelve books
विशाखा हेमचंद्र चितळे यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या या उपक्रमात बारा कवयित्री सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक पुस्तकात एकेका विषयावरच्या सुमारे 100 चतुष्पदी म्हणजेच चारोळ्या आहेत. स्नेह काव्य दिनदर्शिकेची नोंद एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाल्यानंतर पुढचं पाऊल म्हणून स्वतःच पुस्तक स्वतःच्या बळावर प्रकाशित करण्याचं या सगळ्यांनी ठरवलं. मन, पाऊस, माणूस, आकाश, समुद्र, धरती, निसर्ग, षड् रिपु, प्रेम, भावना, नाती, अध्यात्म अशा बारा विषयांवर चतुष्पदींच लेखन प्रत्येकीने केलं आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ रेखा देशपांडे, सौ.संध्या साठे जोशी, सौ. मनाली बावधनकर उपस्थित होत्या. First time publication of twelve books

निवेदन व आभार प्रदर्शन सौ मेघना चितळे यांनी केले. बारा पुस्तकांच्या प्रकाशनाच्या वेळी प्रकाशनाच्या सजावटी बद्दल विशाखा चितळे यांनी माहिती सांगितली. या पुस्तकांची उत्कृष्ट छपाई करणा-या मुद्रक सौ.वरदा बर्वे आणि मुखपृष्ठ तयार करणारे श्री. निरंजन केतकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. बारा नवोदित कवयित्रींच्या वतीने सौ. आदिती तांबे, सौ. अनघा करंदीकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर या पुस्तकांना प्रस्तावना दिलेल्यां पैकी श्री कानडे सर यांनी सर्व कवयित्रींना सुंदर शुभेच्छा दिल्या. First time publication of twelve books
आपल्याला काय म्हणायचं आहे ते फक्त चार ओळीत समोरच्यापर्यंत पोहोचवणं याच्यासाठी खूप मोठं कसब लागतं आजच्या या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने तुमच्यामध्ये जी ज्योत पेटली आहे ती जागृत ठेवा, मिळालेल्या संधीचं सोनं करा असं प्रतिपादन प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना संध्या साठे जोशी यांनी केलं. First time publication of twelve books

या बारा जणी म्हणजे सरस्वतीच्या लेकी असून त्यांच्याकडे चिंतनशील वृत्ती, संदर्भ बहुलता असून त्यांचं एकसंध व्यक्तीमत्व सुसंस्कृत असून भारतीय मूल्यव्यवस्थेचा पुरस्कार करणार आहे. असं या चतुष्पदी संग्रहातून दिसून येतं असं मत डॉ. रेखाताई देशपांडे यांनी व्यक्त केलं. तसंच दिनदर्शिकेचा पहिला विक्रम झाला 12 जणींच्या बारा पुस्तकांचे एकाच वेळी प्रकाशन हा ही एक विक्रमच आहे. अजूनही यापुढे तुम्ही नवीन विक्रम कराल आणि नवीन नवीन शिखर गाठाल अशा शुभेच्छाही रेखाताईंनी दिल्या. First time publication of twelve books
या सर्वजणी नम्रतेने स्वतःला नवोदित म्हणत असल्या तरी सुद्धा त्यांनी शब्द अत्यंत पारखून चाखून वापरलेले आहेत. हे हात नवीन नाही तर कामात गढलेले जाणवतात. आपल्याला जे वाटतं ते मोजक्या शब्दात या हृदयीचे त्या हृदयी घालणं हे सोपं नाहीये आणि ते तुम्हाला जमलंय. बहिणाबाईंच्या कविता आचार्य अत्र्यांच्या हातात पडल्यानंतर त्यांनी हे बावन्नकशी सोनं सगळ्या जगाला कळायला हवं म्हणून प्रस्तावना देऊन त्याचं पुस्तक काढलं म्हणून बहिणाबाई जगाला समजल्या. तसंच आज या पुस्तक प्रकाशनामुळे कोकणाला, चिपळूणला या बहिणाबाईंसम कवयित्री माहीत होतील, असा आशावाद सौ मनाली बावधनकर यांनी व्यक्त केला. First time publication of twelve books

या उपक्रमामध्ये विशाखा चितळे -मनोनीत, अनघा करंदीकर -निसर्गायन, आदिती तांबे -भावतरंग, अंजली मोडक- मुक्तचिंतन, अर्चना ओक- काळीज माया, अस्मिता मालवणकर- रिमझिम, चैताली मराठे- अथांग, स्नेहल दीक्षित- रिपुदल, मेघना चितळे- गाभारा, मेघना आगवेकर –धरित्री, विनया केळकर- ऋणानुबंध, ऋचा भागवत- नभबोली या कवयित्रींची पुस्तके प्रकाशित झाली. First time publication of twelve books
या सर्व पुस्तकांना श्री धनंजय चितळे, श्री मंदार ओक, श्री मुकुंद काणे, श्री कानडे सर, डॉ राजश्री सोमण, प्रा. माधवी जोशी, सौ संध्या साठे जोशी, डॉ रेखाताई देशपांडे, प्रा.गंधे यांच्या प्रस्तावना लाभल्या आहेत. या मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा नेटकेपणाने पार पडला. First time publication of twelve books
