गुहागर, ता. 21 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त गुहागर पंचायत समिती मार्फत तालुकास्तरीय देशभक्तीपर समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील माध्यमिक गटात प्रथम क्रमांक श्रीदेव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, स.सू. पाटील विज्ञान श्री म.ज. भोसले वाणिज्य, कै.विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेने पटकावला. First place of Guhagar High School
या देशभक्तीपर समूह नृत्यामध्ये कु.आर्या समीर पावसकर, कु. नंदिनी महेंद्र महाडिक, कु.आर्या संजय भोळे, कु.श्रावणी मनोज जाधव, कु. कामिनी चंद्रकांत वीर, कु.वेदिका मंदार बोले, कु.वैष्णवी रामचंद्र डोणे या विद्यार्थ्यांनीनी सहभाग दर्शवला होता. या निमित्ताने प्रशालेचे CEO माननीय दीपक कानगुटकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजी आडेकर, उपमुख्याध्यापक श्री सुधाकर कांबळे, व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. First place of Guhagar High School