• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
5 July 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मराठी उद्योजकांची पहिली स्वराज्य मराठी बाजारपेठ

by Mayuresh Patnakar
July 5, 2026
in Maharashtra
40 0
0
First marketplace for Marathi entrepreneurs
78
SHARES
222
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 05 : शिवस्वराज्य मराठी उद्योजकता चळवळ माध्यमातून अतिशय महत्त्वाचा उपक्रम आजपासून सुरू झाला. मराठी माणूस व्यवसाय करत नाही किंवा धंदा जमत नाही अशा चर्चा करण्यापेक्षा जे मराठी तरुण किंवा उद्योगी महिला प्रत्यक्ष व्यवसाय करतात त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे  मराठी माणसांनी मराठी उद्योजकांकडून खरेदी केली पाहिजे. हे सर्व प्रत्यक्षात आणणारा उपक्रम विलेपार्ले येथून सुरू झाला. The first marketplace for Marathi entrepreneurs

लक्ष्मीनारायण प्रसाद लॉन्स सुभाष रोड पार्ले येथे पहिली स्वराज्य मराठी बाजारपेठ सुरू झाली. या बाजारपेठेमध्ये शंभरहून अधिक मराठी उद्योजक सहभागी झाले आहेत यात 80 टक्के महिला उद्योजकांचा सहभाग आहे.  इमिटेशन ज्वेलरी खाद्यपदार्थ, गाय आधारित उत्पादने, महिलांचे कपडे पुरुषांचे कपडे परफ्युम कॉस्मेटिक प्रॉडक्ट सर्वात महत्त्वाचं ग्रामीण भागातील विविध उद्योजक कोकणी प्रॉडक्ट ग्रामीण प्रॉडक्ट घेऊन या बाजारपेठेत सहभागी झाल्या आहेत. कोकणातील उद्योजक मोठ्या प्रमाणात आहेत पण त्याचबरोबर विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातून अनेक उद्योजक या बाजारपेठेत सहभागी आहेत. The first marketplace for Marathi entrepreneurs

First marketplace for Marathi entrepreneurs

गेली तेरा वर्ष ग्लोबल कोकण नावाचा प्रचंड यशस्वी महोत्सव शिवस्वराज्य चळवळीचे संस्थापक संजय यादवराव चालवतात . गेली चार वर्ष कोकणी बाजारपेठ हा कोकणी उद्योजकांचा उपक्रम अजय यादव चालवतात आजपर्यंत 116 कोकणी बाजारपेठा झाल्या. हे दोन प्रचंड यशस्वी ब्रांड एकत्र येऊन मराठी उद्योजकांकरता एक  व्यापक व्यासपीठ निर्माण करायचे ठरवले आहे. याची सुरुवात मराठमोळ्या विलेपार्ले मधून झाली आता संपूर्ण मुंबईत कोकणी बाजारपेठ आणि स्वराज्य मराठी बाजारपेठ हे उपक्रम आयोजित करण्यात येते आणि भविष्यामध्ये हेच उपक्रम ठाणे पुणे नाशिक छत्रपती संभाजी नगर नागपूर अमरावती आणि महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये राबवले जातील  यानिमित्ताने ग्लोबल कोकणचे 1000 व्यावसायिक आणि कोकणी बाजारपेठ चे 1000 व्यवसायिक एकत्र आले आहेत भविष्यामध्ये लाखो मराठी उद्योजक एकत्र येऊन अशा स्वरूपाच्या फक्त आणि फक्त मराठी व्यवसायिकांचा सहभाग असलेल्या बाजारपेठा आपण सुरू करत आहोत.  The first marketplace for Marathi entrepreneurs

सगळेच जण म्हणतात मराठी माणसांनी मराठी माणसांकडून खरेदी केली पाहिजे पण आता मुंबईच्या फुटपाथवर फेरीवाला किंवा दुकानांमध्ये मराठी माणूस शोधावा लागतो अशी स्थिती आहे पुन्हा मुंबईमध्ये मराठी लोकांनी मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला पाहिजे म्हणून ही बाजारपेठ महत्त्वाची आहे.  शिवस्वराज्य चळवळीच्या माध्यमातून भविष्यामध्ये अशा कायमस्वरूपी बाजारपेठा ठिकठिकाणी व्हाव्यात हा प्रयत्न आम्ही करणार आहोत. मराठी माणूस मराठी भाषा मराठी सिनेमा या विषयावर भाषणे करण्यापेक्षा आता प्रत्यक्ष काम करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी आणि संस्थानी पुढाकार घेतला पाहिजे. The first marketplace for Marathi entrepreneurs

पहिल्याच दिवशी प्रचंड पाऊस असताना सुद्धा या बाजारपेठेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे पुढच्या तीन दिवसात मोठ्या संख्येने वेस्टर्न मुंबईमधील आणि विशेषता पार्ले अंधेरी सांताक्रुज भागातील लोक या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात येतील आणि खरेदी करतील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला. The first marketplace for Marathi entrepreneurs

पार्ले मधील स्थानिक नगरसेविका अंजली सामंत आणि माजी नगरसेवक अभिजीत सामंत, हिंदीमधील लोकप्रिय स्टँड अप कॉमेडियन आणि मराठी सिने अभिनेते नवीन प्रभाकर, दुसरे सिने अभिनेते आणि या बाजारपेठेचे ब्रँड अँबेसिडर अभिजीत केळकर, शिवस्वराज्य चळवळीचे संस्थापक संजय यादवराव कोकण बाजारपेठेचे प्रमुख अजय यादव ग्लोबल कोकणच्या प्रमुख राजश्री यादवराव, असे अनेक मान्यवर या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी आवर्जून उपस्थित होते.  The first marketplace for Marathi entrepreneurs

सर्व मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात मराठी उद्योजकांच्या या अभिनव उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे आणि खरेदी करावी अशी आवाहन यानिमित्ताने संयोजकांनी केले आहे. The first marketplace for Marathi entrepreneurs

Tags: First marketplace for Marathi entrepreneursGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share31SendTweet20
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.