गुहागर, ता. 17 : देशात प्रथमच कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती होणार आहे. पुणे शहरात महानगरपालिकेकडून हा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. यामुळे पुणे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. First Hydrogen project in Pune

पुणे मनपाने ‘द ग्रीन बिलियंस लिमिटेड’ (TGBL) या कंपनीशी 30 वर्षांचा करार केला आहे. या प्रकल्पात पुढील वर्षापासून रोज 350 टन कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती होणार आहे. त्यासाठी कंपनी 350 कोटींची गुंतवणूक करणार आहे. तसेच लॉजिस्टीक व इतर सुविधांसाठी 82 कोटी खर्च करणार आहेत. पुणे येथील हडपसर इंडस्ट्रियल एस्टेट मध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पुणे महापालिका, वेरियट पुणे वेस्ट टू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि द ग्रीन बिलियन्स लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून रामटेकडी येथील महापालिकेच्या जागेत भारतातील पहिला प्रकल्प उभारला जाणार आहे. डीबुट पध्दतीने हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पात दिवसाला सुमारे 350 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली होणार आहे. त्याद्वारे 150 टन आरडीएफ तर 9 मेट्रिक टन हायड्रोजन निर्मिती होणार आहे. First Hydrogen project in Pune
हायड्रोजन निर्मितीचा हा प्रकल्प देशासाठी वरदान ठरणार आहे. यातून निर्माण होणारा गॅस घरगुती तसेच व्यावसायिक कारणासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच शहरातील कार्बन उर्त्सजन कमी होण्यासही हातभार लागणार आहे. First Hydrogen project in Pune