गुहागर, ता. 24 : गुहागर तालक्यातील शृंगारतळी येथील रिगल कॉलेज मध्ये दि. २२ ऑगस्ट रोजी अग्निशामक प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचे आयोजन अंजनवेल येथील आरजीपीपीएल (RGPPL) कंपनीचे सुरक्षा अधिकारी सागर गुरव यांच्यातर्फे करण्यात आले होते. Firefighter training at Shringaratali


प्रथम रिगल कॉलेजच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी श्री. सागर गुरव यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. आपल्या प्रशिक्षणामध्ये त्यांनी उष्णता म्हणजे काय, उष्णतेचे प्रकार कोणते, याबाबत माहिती दिली. अग्निप्रतीबंधाचे तीन प्रकार कुलिंग स्मूथिंग व स्टारवेशन याचीही माहिती दिली. तसेच शाँर्ट सर्किटची कारणे, एलपीजी वापरताना घ्यावयाची काळजी याबद्दल सांगितले. शिवाय अग्नीरोधक कसे हातळायचे याबद्दल मार्गदर्शन केले. आगीमध्ये जखमी झालेल्या माणसांवरती उपचार कसे करायचे याबद्दल महत्वाची माहिती दिली. Firefighter training at Shringaratali


या अग्निशामक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्राध्यापक श्री. मनीष पवार यांनी केले. या प्रशिक्षणासाठी रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. Firefighter training at Shringaratali

