गुहागर, ता. 06 : ग्राहकांना विनम्र आणि विश्वासाची सेवा देणाऱ्या चिपळूण अर्बन को. ऑप. बँक शाखा गुहागर कडून तालुक्यातील अडूर येथील पिपंळेश्वर ट्रॅव्हल्सचे मालक विक्रांत वानरकर यांना दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नव्या दोन ट्रॅव्हल्स घेण्यासाठी एक कोटी रुपयांचे अर्थ सहाय्य करण्यात आले. Financial assistance from Chiplun Urban Bank


श्री. वानरकर यांनी याआधीही चिपळूण अर्बन बॅकेकडून ट्रॅव्हल्स घेण्यासाठी आर्थिक सहाय्य घेतले आहे. बँकेच्या विश्वासास पात्र ठरल्याने बँकेने पुन्हा दोन गाड्यांसाठी सहकार्य केले आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर सदर बसच्या चाव्या श्री. वानरकर यांना प्रदान करण्यात आल्या. यावेळी गुहागर शाखेचे पालक संचालक श्री. धनंजय खातू, श्री. प्रशांत शिरगावकर, गुहागर शाखेचे शाखाधिकारी श्री. संतोष संसारे, ज्यु. ऑफिसर श्री. रजनीश सकपाळ व शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. Financial assistance from Chiplun Urban Bank