डोंबिवली मनसेने दिले सहाय्यक आयुक्त यांना निवेदन
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 01 : डोंबिवली पश्चिमेतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त तथा नवनिर्वाचित ‘ह प्रभाग क्षेत्र’ अधिकारी श्रीमती स्नेहा करपे यांची सदिच्छा भेट दिली. यावेळी विभागातील समस्यांचे पत्रक दिले. व लवकरात लवकर त्यावर निवारण करण्याची विनंती केली. Fill potholes on roads before Ganesh Chaturthi

प्रामुख्याने संपूर्ण ‘ह’ प्रभागातील विभागाचा पाहणी दौरा करून बंद असलेले विजेचे दिवे, उघडी गटारं, ठिकठिकाणी टाकलेल्या कचऱ्यामुळे परिसरात पसरलेली दुर्गंधी या समस्यांचे निवारण करण्याची विनंती केली. तसेच काही दिवसांत गणपती बाप्पांचे आगमन होणार असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेशमुर्त्या आणताना रस्त्यांवरील खड्डयांमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आपल्या क्षेत्रातील सर्व खड्डे गणेशचतुर्थी पूर्वी भरावेत, असेही निवेदनात प्रामुख्याने म्हटले आहे. Fill potholes on roads before Ganesh Chaturthi

यावेळी डोंबिवली शहर सचिव गणेश कदम यांच्या सोबत उपशहर अध्यक्ष राजू सदु पाटील, उपशहर अध्यक्ष प्रेम पाटील, शाखा अध्यक्ष नंदकिशोर भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. Fill potholes on roads before Ganesh Chaturthi

