गुहागर, ता. 03 : येथील ग्रामदेवता श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थानचा देवदिवाळी उत्सव मोठया दिमाखात साजरा करण्यात आला. यानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यानिमित्त पहाटे काकड आरती, अभिषेक व पूजा, देवांना रुपे लावण्याचा कार्यक्रम, तसेच भाविकांसाठी देवदर्शन, रात्रौ ठिक १०.०० वा. पर्यंत गावांतील भजनांचा कार्यक्रम, श्री वाघजाई जाखडी नृत्य मंडळ, आगवे-हुमणेवाडी शक्तीवाले शाहीर श्री. संदिप हुमणे प्रस्तुत कोकणची लोककला जाखडी नृत्य पार पडले. Festival of Bhirivyaghrambari Devi


यानिमित्त संपूर्ण मंदिर परिसरात विदयुत रोषणाई करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्याठी श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थानचे अध्यक्ष शरद शेटे, सेक्रेटरी अरूण गुरव, खजिनदार मुरलीधर बागकर व सर्व देवस्थान कमिटी सदस्यांनी मेहनत घेतली. Festival of Bhirivyaghrambari Devi

