• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 July 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर ज्ञानरश्मी वाचनालयातर्फे विद्यार्थ्यांच्या सत्कार

by Manoj Bavdhankar
July 1, 2026
in Guhagar
29 0
0
Felicitation by Guhagar Gyanrashmi Library
57
SHARES
163
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कठोर परिश्रमालाच यशाची गुरुकिल्ली : सुजाता कांबळे

गुहागर, ता. 01 : आजच्या विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळवायचे असेल तर कठोर परिश्रमाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे प्रतिपादन श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागरच्या मुख्याध्यापिका सुजाता कांबळे यांनी केले. गुहागर तालुका ज्ञानरश्मी वाचनालयाच्या वतीने ज्ञानरश्मी वाचनालय सभागृहात आयोजित दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. Felicitation by Guhagar Gyanrashmi Library

यावेळी त्या म्हणाल्या की, आज अनेक विद्यार्थी यश मिळविण्यासाठी शॉर्टकटचा अवलंब करताना दिसतात. मात्र, खरे आणि टिकाऊ यश हे मेहनत, सातत्य आणि संघर्षाच्या जोरावरच मिळते. विद्यार्थ्यांनी स्वतःची गुणवत्ता परिश्रमाच्या बळावर सिद्ध करावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात दहावी व बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. Felicitation by Guhagar Gyanrashmi Library

यावेळी माजी मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, कवी ज्ञानेश्वर झगडे, डी. पी. गुरव, प्रभुनाथ देवळेकर, स्वामिनी भोसले, गौरी घाडे, ज्ञानरश्मी वाचनालयाचे कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनाली बावधनकर यांनी केले. Felicitation by Guhagar Gyanrashmi Library

Tags: Felicitation by Guhagar Gyanrashmi LibraryGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share23SendTweet14
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.