रत्नागिरी तालुक्यातील 10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव
रत्नागिरी, ता.03 : क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी येथे इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार करण्याचे ठरविले आहे. हा सत्कार क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरीतर्फे रविवारी दि. १० जुलै रोजी सायंकाळी ५:०० वाजता करण्यात येणार आहे. तरी रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी सायंकाळी ५:०० वाजता हॉटेल विवेक, मराठा मैदान, जुना माळनाका येथे उपस्थित रहावे. Felicitates by Kshatriya Maratha Mandal

मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत आणि आधारकार्डची सत्यप्रत ६ जुलैपर्यंत दुपारी १.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत (सोमवार व शासकीय सुट्या सोडून) क्षत्रिय मराठा मंडळाच्या बेसमेंट स्टोअर क्र.३, बी विंग, सिद्धिविनायक रेसिडेन्सी, मजगाव रोड, रत्नागिरी येथे जमा करावी. Felicitates by Kshatriya Maratha Mandal

क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरीतर्फे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी. दरवर्षी मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी उपयुक्त अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असते. मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, २०२२ यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेला ८५ टक्के अथवा अधिक गुण, इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये ८० टक्के अथवा अधिक गुण (गुणपत्रिकेवरील टक्केवारी प्रमाणे) मिळाले आहेत, अशा रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवारी १० जुलै रोजी सायंकाळी ५:०० वाजता हॉटेल विवेक, मराठा मैदान, जुना माळनाका येथे करण्यात येणार आहे. Felicitates by Kshatriya Maratha Mandal