परभणीच्या सेलू येथील विद्यार्थीनीने घेतला गळफास ; निकाल मात्र वेगळाच लागला
गुहागर, ता. 27 : आपल्या सोबतचे विद्यार्थी पास होतील, मात्र आपणच नापास होऊ या भीतीने बारावीची परीक्षा दिलेल्या एका मुलीने निकालाच्या आदल्या दिवशी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना परभणीच्या सेलू शहरामध्ये घडली आहे. Fear of failure ended life
संयुक्ता बालाजी उबाळे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. संयुक्ताने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा बारावीचा निकाल आला. यामध्ये ती पास असल्याचं समोर आले आहे. दरम्यान, संयुक्ताने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे उबाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. Fear of failure ended life

बालाजी उबाळे यांची मुलगी संयुक्ता उबाळे शेलू शहरातील नूतन महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. नुकतीच पार पडलेली बारावीची परीक्षा तिने दिली होती. परीक्षेदरम्यान तिची तब्येत ठीक नसल्याने ती रुग्णालयात जात असे. नुकत्याच दिलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये आपल्या सोबतचे विद्यार्थी पास होतील आणि आपणच नापास होऊन अशी भीती तिच्या मनामध्ये होती. शिक्षण विभागाने बारावीचा निकाल 25 मे ला जाहीर होणार असल्याची घोषणा केली. आपण बारावीच्या परीक्षेमध्ये नापास होणार या चिंतेत असलेल्या संयुक्ता उबाळे हिने 24 मे रोजी सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान आपल्या राहते घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. विशेष बाब म्हणजे दुसऱ्या दिवशी बारावीचा निकाल लागल्यानंतर संयुक्ता उबाळेही पास झाली होती. Fear of failure ended life

