निलेश सुर्वे आणि सचिन ओक यांनी घडवली भेट
गुहागर, ता. 26 : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंत्रालयात बैठक बोलावण्याचे आश्र्वासन दिले. त्याच्याबरोबर झालेल्या चर्चेने समाधान झाल्याने दिपक परचुरे यांनी गुहागर विजापूर महामार्गाबाबतचे उपोषण मागे घेतले. दिपक परचुरे यांच्या उपोषणाच्या नोटीसीमुळे ठेकेदाराने देखील अनेक ठिकाणच्या जोडरस्त्यांचे डांबरीकरण केले. त्यामुळे वाहतुकदारांना किमान दिलासा मिळाला आहे. निलेश सुर्वे आणि सचिन ओक यांनी दिपक परचुरे आणि रविंद्र चव्हाण यांची भेट घडवून आणली होती. Fasting on Guhagar Bijapur Highway
गुहागर विजापूर महामार्गाच्या अर्धवट कामामुळे अनेकजण त्रस्त होते. मात्र शासनाशी दोन हात करण्यास कोणीच तयार नव्हता. दिपक परचुरे यांनी या समस्येबाबत अनेकवेळा संबंधित विभागांकडे पत्र व्यवहार केला. मात्र त्याला प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे अखेर दिपक परचुरे यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. याबाबत जिल्हाधिकारी, प्रांत, महामार्ग प्राधिकरण, तहसीलदार आदी अधिकाऱ्यांना पत्र लिहून कळवल्यावर यंत्रणा हलली. प्रजासत्ताक दिनी त्यांनी उपोषण करु नये म्हणून प्रशासनातर्फे पत्रव्यवहार झाला. गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना गुहागरमध्ये बैठकीसाठी बोलावले. या बैठकीला दिपक परचुरे यांनी गुहागरमधील विविध सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनाही आमंत्रीत केले. परंतु बैठकीला महामार्ग प्राधिकरणने पाठवलेल्या अधिकाऱ्याला गुहागर विजापूर महामार्गाबाबत लेखी आश्र्वासन देण्याचा कोणताच अधिकार नव्हता. त्यामुळे संतप्त गुहागरवासीयांनी जनआंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा शासनाला दिला. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी दिपक परचुरे उपोषणाला बसणार हे निश्चित झाले होते. Fasting on Guhagar Bijapur Highway

दरम्यान महाराष्ट्र सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे गुहागर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे आणि सरचिटणीस सचिन ओक यांनी सदर उपोषणाची माहिती मंत्री चव्हाण यांना दिली. आपण मध्यस्थी केल्यास उपोषण टाळता येईल अशी विनंतीही सुर्वे आणि ओक यांनी केली. भाजप पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत रविंद्र चव्हाण यांनी दिपक परचुरे यांची भेट घेण्यास अनुमती दिली. Fasting on Guhagar Bijapur Highway
निलेश सुर्वे आणि सचिन ओक यांनी दिपक परचुरे आणि रविंद्र चव्हाण यांची भेट घडवून आणली. त्यावेळी महामार्गाच्या अर्धवट कामामुळे वाहतुकदारांना होणारा त्रास, चार वर्ष संपली तरीही महामार्गाचे काम पूर्णत्वास न जाणे, अधिकाऱ्यांकडून न मिळणारा प्रतिसाद, रखडलेले भुसंपादन या सर्व गोष्टी दिपक परचुरे यांनी मंत्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या विषयांचे गांभिर्य लक्षात घेवून मंत्री चव्हाण म्हणाले की, मंत्रालयामध्ये बैठक बोलावण्यात येईल. या बैठकीला प्रांत, महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, अन्य संबंधित खात्यांचे अधिकारी, ठेकेदार यांना बोलावण्यात येईल. त्याचबरोबर दिपक परचुरे यांनाही निमंत्रीत केले जाईल. या बैठकीमध्ये सर्व विषयांवर तोडगा काढु, असे आश्र्वासन मंत्री चव्हाण यांनी दिपक परचुरे यांना दिले. Fasting on Guhagar Bijapur Highway
त्यानंतर प्रांताधिकारी यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती पत्राद्वारे दिपक परचुरे यांना केली. प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण असल्याने भारतीय नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून राष्ट्रीय सणाचे दिवशी उपोषण न करण्याचा निर्णय दिपक परचुरे यांनी घेतला. Fasting on Guhagar Bijapur Highway
