• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेत ग्रामस्थांचे २ जानेवारीला आमरण उपोषण

by Ganesh Dhanawade
December 26, 2022
in Guhagar
147 2
0
Fasting Death of villagers in Palshet
289
SHARES
825
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शौचालय दुरुस्ती घोटाळ्या प्रकरणी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पालशेत, निवोशीच्या हद्दीतील शौचालय दुरुस्ती कामात घोटाळा करण्यात आला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करुनही  या गंभीर विषयाची दखल गटविकास अधिकारी घेऊ इच्छित नाहीत. किंवा जाणीवपूर्वक त्यांना ती घ्यायची नाही असे दिसून येत आहे. अशा पंचायत समिती अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी ग्रा. पं. सदस्य तथा शाखाप्रमुख मिनार पाटील आणि ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयासमोर दि. २ जानेवारी रोजी आमरण उपोषणाला बसणार आहेत. असा इशारा पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. Fasting Death of villagers in Palshet

पालशेत, निवोशी शौचालय दुरुस्ती कामातबाबत दि. १४ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी पत्र/निवेदन आणि तोंडी माहिती दिली. भ्रष्टाचारी ठेकेदार आणि पालशेत ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांची गटविकास अधिकारी प्रशांत राऊत पाठराखण करीत आहेत का? असा सवाल उपस्थित केला. याबाबत दि. ३० डिसेंबरपर्यंत सक्षम अधिकाऱ्यांनी सदर कामांची तक्रारदार ग्रामस्थांसह पाहणी केली. त्याचा लेखी अहवाल जागेवर न केल्यास याबाबत प्रत्यक्ष पाहणी आणि चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करता ग्रामपंचायत निवडणुकांचे कारण देऊन १८ डिसेंबर रोजी या विषयामध्ये लक्ष देतो. असे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिले. Fasting Death of villagers in Palshet

मात्र प्रत्यक्षात १६ डिसेंबर रोजी पंचायत समिती बांधकाम विभागाच्या कोणा अधिकाऱ्यांनी संबंधित तीनही शौचालयांची तक्रारदारांना विश्वासात न घेता, न बोलावता पाहणी केली. यावरूनच गटविकास अधिकाऱ्यांनी ठेकेदार आणि ग्रामपंचायत पालशेत पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करतायत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण संबंधित शौचालय दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याचे लावलेले फलक पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर बदलण्यात आलेले आहेत. याचाच अर्थ याबाबतची सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांनीच भ्रष्ट ठेकेदार आणि पालशेत ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांना दिली असण्याची दाट शक्यता आहे. मिनार पाटील आणि ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे संबंधित कामांच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली होती. मात्र सर्व कामे पाहून आल्याचे सांगत तक्रारदारांची मागणी फेटाळून लावली. परंतु त्याच वेळी सर्व कामे योग्य झाली आहेत का, याबाबत काहीच भाष्य केले नाही. स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यापासून ते पंचायत समिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच याबाबत जबाबदार असलेले संबंधित एकतर कोणाच्या तरी दबावाखाली आहेत. किंवा या सर्वांची या प्रकरणामध्ये टक्केवारीसाठी केलेली मिलीभगत आहे. असाच एकमेव अर्थ या सगळ्यातून निघतो. Fasting Death of villagers in Palshet

दिलेली मुदत संपून गेल्यावरही या गंभीर विषयाची दखल गटविकास अधिकारी घेऊ इच्छित नाहीत. किंवा जाणीवपूर्वक त्यांना ती घ्यायची नाही असे दिसून येत असल्याने ३०डिसेंबर पर्यंत सदरच्या सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी सक्षम अधिकाऱ्यांनी तक्रारदार आणि ग्रामस्थांसह न केल्यास, तसेच त्याचा लेखी अहवाल जागेवरतीच न केल्यास, २ जानेवारी रोजी पंचायत समितीच्या गैर कारभारचा तसेच ग्रामपंचायतींना भ्रष्टाचाराचे अड्डे बनविण्यासाठी आणि भ्रष्टाचारी ठेकेदारांचे उखळ पांढरे करण्यासाठी मदत करणाऱ्या पंचायत समिती अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी ग्रा. पं. सदस्य तथा शाखाप्रमुख मिनार पाटील आणि ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. Fasting Death of villagers in Palshetपालशेत शाळा शौचालय दुरुस्ती कामात घोटाळा

Tags: Fasting Death of villagers in PalshetGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share116SendTweet72
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.