गुहागर, ता. 25 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी असणाऱ्या रिगल कॉलेज शृंगारतळीमार्फत (Regal College Shringartali) फॅशन डिझायनिंग (Fashion designing) विभागातर्फे दि.1 एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. Fashion Designing Training at Regal College
या कार्यक्रमासाठी पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी, उपाध्यक्ष, श्रीमती सुचिता सुशील वेल्हाळ उपस्थित होत्या. प्रथम रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. या १५ दिवसीय प्रशिक्षणामध्ये हेअरस्टाईल मेकिंग, बेसिक मेकअप आणि ब्रायडल मेकअप, ज्वेलरी मेकिंग, अक्रोमॅटिक कुल आणि वॉम कलर, फॅब्रिक पेंटिंग, स्टेनसिल पेंटिंग, प्रिन्सेस ब्लाउज, अम्ब्रेला फ्रॉक, एम्ब्रॉडरी इ. शिकवण्यात आले. Fashion Designing Training at Regal College

या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा सुद्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये हेअरस्टाईल मेकिंग स्पर्धेमध्ये कु.तन्वी पालशेतकर, प्रिन्सेस ब्लाउज पेपर ब्लॉक कटिंग स्पर्धेमध्ये कु.साक्षी खरे, बुके मेकिंग स्पर्धेमध्ये कु.आदिती मोरे, सर्कल स्टीच स्पर्धेमध्ये कु. सानिया बागकर,बेस्ट ड्रॅाइंग स्पर्धेमध्ये कु. केतकी निमकर तसेच बेस्ट परफॉर्मन्स स्पर्धेमध्ये कु.पायल वेल्हाळ यांचे बक्षीस वितरण व सहभाग प्रमाणपत्र श्रीमती सुचिता वेल्हाळ यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना देण्यात आले. यावेळी बोलताना सुचिता वेल्हाळ यांनी सांगितले कि, १० वी व १२ वी च्या विद्यार्थिनीनी व्यावसायिक कोर्सेसबरोबर आपले पदवीधर शिक्षणसुद्धा पूर्ण करावे. हि काळाची गरज आहे. नोकरी करून सुद्धा तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण करू शकता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शाहरुख चोगले यांनी केले. प्रा.सौ.रेश्मा मोरे यांनी या कार्यक्रमांचे आभारप्रदर्शन केले. Fashion Designing Training at Regal College

यावेळी रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते. रिगल कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय शिर्के, संचालिका डॉ.सौ.सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Fashion Designing Training at Regal College
