शेतकऱ्यांसाठी सरकारकडून ७०० कोटींचा निधी मंजूर
गुहागर, ता. 18 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अनुदान दिले जाणार आहे. यासाठी आता राज्य सरकारने तब्बल ७०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. Farmers will get subsidy
महाविकास आघाडी सरकारच्या काळात या योजनेत शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोरोना महामारीमुळे यासाठी निधीप्राप्त होऊ शकला नाही. त्यामुळे आता शिंदे फडणवीस सरकारने यासाठी निधी मिळवला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरले आहे अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. Farmers will get subsidy

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ७०० कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याने राज्याच्या तिजोरीवर याचा भार पडणार आहे. या आधी २ हजार ९०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे आता एकूण ४ हजार ७०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार राज्याच्या तिजोरीवर पडला आहे. Farmers will get subsidy
शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी नियमित कर्ज भरणे अनिवार्य आहे. २०१७ पासून ते २०२० पर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळू शकते. २०१७ पेक्षा आधी कर्ज घेतलेले शेतकरी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत. सदर अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्याने २०१७ ते २०२० या काळात किमान सलग दोन वर्षे कर्जाची परतफेड केली असावी. Farmers will get subsidy
