शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयाचे आयोजन
गुहागर, ता. 29 : तालुक्यातील निगुंडळ येथे 26 जुलै 2022 रोजी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत, शेतकरी शाळेचे आयोजन करण्यात आले होते. शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आला. यावेळी गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच मॅडम सौ. दीप्ती गीजे, उपसरपंच श्री. सुभाष गावडे, ग्रामसेवक आणि गावातील शेतकरी असे एकूण २० ते २५ लोक उपस्थित होते. Farmers School at Nigundal


यावेळी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व, सेंद्रिय शेती कशी करावी, सेंद्रीय शेतामध्ये वापरली जाणारी सेंद्रिय खते, संजीवके, सेंद्रिय पद्धतीने कीड व्यवस्थापन, बुरशीजन्य रोग व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी जीवामृत, बिजामृत, अमृतपाणी, पंचगव्य, सप्तधान्यांकुर (संजीवक), दशपर्णी अर्क, कडुनिंबाच्या पानांचा अर्क, बोर्डएक्स मिश्रण, अशा वेगवेगळ्या सेंद्रिय शेतीत वापरल्या जाणाऱ्या खतांची व संजिवकांचीं माहिती दिली तसेच ते तयार करण्याची पद्धत त्यांचे प्रमाण याबद्दल सविस्तर माहिती दिली. गावातील शेतकऱ्यांनी सेंद्रियशेती विषयक प्रश्न विचारले. सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी उपस्थित सरपंच तसेच सर्व पदाधिकारी आणि शेतकरी यांनी कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रत्येक वाडीमध्ये कार्यक्रम घेण्याची मागणी केली. Farmers School at Nigundal

