• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात अनंत चतुर्दशीच्या बाप्पाला निरोप

by Ganesh Dhanawade
September 29, 2023
in Guhagar
143 1
0
Farewell to Bappa on Anant Chaturthi in Guhagar

Farewell to Bappa on Anant Chaturthi in Guhagar

280
SHARES
800
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29 : गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला…अशा जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात अनंत चतुर्दशीच्या गणपती बाप्पांना गुहागर तालुक्यात भक्तीभावात निरोप देण्यात आला. तालुक्यात दहा हजारहून अधिक घरगुती गणपतींच्या मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. Farewell to Bappa on Anant Chaturthi in Guhagar

Farewell to Bappa on Anant Chaturthi in Guhagar
Farewell to Bappa on Anant Chaturthi in Guhagar

गेली 10 दिवस तालुक्यातील प्रत्येक घरात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. घरोघरी मंगलमय वातावरणात बाप्पाची पूजाअर्चा सुरू झाली. गुरुवारी दुपारनंतर दहा दिवसाच्या गणपतींना निरोप देण्यास सुरुवात झाली. अतिशय शांततेत गणपती बाप्पाचे सायंकाळी विसर्जनस्थळी आगमन होत होते. त्याठिकाणी गणपती बाप्पाची पूजाअर्चा आणि आरती करून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येत होते. नागरिकांनी नद्या नाल्यामध्ये तर काही ठिकाणी समुद्रकिनारी विसर्जन केले. विसर्जनावेळी पावसाचे सावट असल्याने दुपारनंतर अनेकांनी गणपती विसर्जनासाठी बाहेर काढले होते. Farewell to Bappa on Anant Chaturthi in Guhagar

सायंकाळी पावसाने रिमझिम सुरुवात केली होती. मात्र, थोड्यावेळाने पावसाने पाठ फिरवताच गणेश भक्तांच्या आनंदात आणखीनच भर पडली. अनेक भजनी मंडळांनी भजनी व किनाऱ्यावर रिंगण घालून गणपतीच्या गाण्यावर ठेका धरला. गुहागर खालचापाट परिसरात अनेक मोठ्या मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. गुहागर शहरासह असगोली, वरचापाट बाग, आरे, वेलदूर, अंजनवेल, धोपावे, पालशेत, वेळणेश्वर, कोंडकारुळ, बोऱ्या, साखरी आगर, नरवण, तवसाळ या समुद्र किनाऱ्यावर तर कोतळूक, गिमवी, आबलोली, तळवली, वडद, देवघर, झोंबडी, कुटगिरी, पाभरे, मळण, वेलंब, शृंगारतळी, चिखली याठिकाणी नागरिकांनी नद्या – नाल्यामध्ये बाप्पाच्या मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. Farewell to Bappa on Anant Chaturthi in Guhagar

Farewell to Bappa on Anant Chaturthi in Guhagar

Tags: Farewell to Bappa on Anant Chaturthi in GuhagarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share112SendTweet70
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.