गुहागर, ता. 09 : गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, अशा जयघोषात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना गुहागरमध्ये भक्तीभावात निरोप देण्यात आला. तालुक्यात सतराशेहून अधिक घरगुती गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. Farewell to Bappa for one and a half days
शनिवारी गणपती बाप्पांचे आगमन झाले. घरोघरी मंगलमय वातावरणात बाप्पाची पूजाअर्चा सुरू झाली. रविवारी सायंकाळी दीड दिवसाच्या गणपतींना निरोप देण्यात आला. अतिशय शांततेत दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन स्थळी आगमन होत होते. त्याठिकाणी गणपती बाप्पाची पूजाअर्चा आणि आरती करून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येत होते. गेले अनेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बाप्पांच्या विसर्जनावेळी सुरुवात केल्याने गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडले होते. रिमझिम पाऊस आणि मध्येच कडक उन्ह असे वातावरण होते. दीड दिवसांच्या बाप्पाचे तालुक्यात दुपारपासून विसर्जन करण्यास सुरुवात झाली. Farewell to Bappa for one and a half days
नद्या, नाले तर गुहागर चौपाटीसह असगोली, खालचापाट, पालशेत, अडुर कोंडकारूळ, वेळणेश्वर, साखरी आगर, हेदवी, तवसाळ, वरचापाट बाग, वेलदुर, अंजनवेल, धोपावे आदी ठिकाणे समुद्रकिनारी लाडक्या बाप्पाचे वाजगाजत मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. गुहागर नगरपंचायतीचे कर्मचारी व त्या त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी खबरदारी म्हणून विसर्जन ठिकाणी लक्ष ठेऊन होते. तसेच पोलिसांनीही काही विसर्जन ठिकाणी हजेरी लावली होती. Farewell to Bappa for one and a half days