गुहागर , ता. 08 : ज्ञाती मराठा संघटना गुहागरच्या पुणे विभागाचे प्रथम कौटुंबिक स्नेहसंमेलन नूकतेच रोकडोबा मंदिर हॉल, शिवाजीनगर गावठाण पुणे येथे पार पडले. हे स्नेहसंमेलन ज्ञाती मराठा संघटना गुहागरचे अध्यक्ष श्रीयुत भगवान शेठ कदम यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव श्री अमिश कदम व शरद विचारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. Family gathering of the Jnati Maratha Association
दीपप्रज्वलन करून गणपती – तुळजाभवानी प्रतिमेला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला मान्यवरांचे संघटनेच्या पुणे विभागातर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळेस भगवान शेठ कदम यांनी गिम्हवी येथील मराठा भवनांच्या विषयी बोलताना मराठा भवनाची पार्श्वभूमी व सध्या सुरू असलेल्या बांधकामाविषयीची माहिती दिली. श्री अमिश कदम यांनी मराठा भवनाचे महत्त्व व पूर्ण झाल्यानंतर समाजाला होणारें फायदे याचे विश्लेषण केले. सर्व मराठा बंधू भगिनींना भवनाच्या बांधकामासाठी आर्थिक हातभार लावण्याचे आव्हान करताना पुण्याच्या उपसंघटनेला शुभेच्छा व्यक्त केल्या. Family gathering of the Jnati Maratha Association


ज्ञाती मराठा संघटना गुहागरच्या पुणे विभागाचे अध्यक्ष श्री अर्जुन सावंत यांनी मंचावरील उपस्थित पाहुण्यांचे व जमलेल्या सर्व मराठा बंधू भगिनींचे संघटनेच्या पुणे विभागाच्या वतीने आभार मानले तसेच कमीत कमी दिवसांमध्ये अविरत मेहनत घेऊन हा कार्यक्रम उत्तमरीत्या पार पाडण्यास मदत करणाऱ्या संघटनेच्या सर्व सहकारी बंधू-भगिनींचे कौतुक केले. पुणे शहरात नोकरी व्यवसायाच्या निमित्त स्थायिक झालेले गुहागर वासीय त्यांच्यामध्ये प्रेम जिव्हाळा व सलोख्याचे नाते निर्माण व्हावे. शिक्षण, नोकरी – धंदा व डॉक्टर उपचार यामध्ये आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य मिळावे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या आपल्या संघटनेच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहून सहकार्य करावे असे, आवाहन अध्यक्षांनी केले. सौ प्रीती पवार यांनी आपले विचार मांडताना महिलांनी आपला संसार चालवताना लहान मुलांवर कशाप्रकारे संस्कार करावे, त्याना कशी शिस्त लावावी याविषयी आपले विचार मांडले. पुणे विभागाचे सचिव श्री प्रवीण पवार यांनी पुणे विभागीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली. त्यानंतर “सद्गुरूकला क्रीडा मंच” च्या प्रशिक्षक तन्वी भेकरे यांच्या बाल चमुंचा लाठी, तलवार, दांडपट्टा अशा शिवकालीन प्रात्यक्षिकांचा बहारदार कार्यक्रम उपस्थितांचे मन जिंकून गेला. महिलांचे हळदीकुंकू आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाले. Family gathering of the Jnati Maratha Association


यावेळेस मंडळाचे उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर जाधव, कार्याध्यक्ष दिलीप कदम, सह सेक्रेटरी बी डी शिंदे, खजिनदार प्रवीण विचारे, सहखजिनदार लक्ष्मीकांत खेतले, संघटनेचे पुणे विभागाचे मुख्य सल्लागार दत्ताराम खेतले, सदस्य संदीप जोशी, गणेश जांभळे, चिन्मय सावंत, अंकुश सावंत, परेश चव्हाण, संजय भेकरे, विपुल कदम इत्यादी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमित सावंत यांनी केले. कार्यक्रमानंतर एकत्रित स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. Family gathering of the Jnati Maratha Association