• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 May 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुंबई येथे कौटुंबिक मेळावा पर्व २ रे संपन्न

by Manoj Bavdhankar
January 10, 2025
in Guhagar
310 3
0
Family gathering in Mumbai
608
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.  10 : श्री नवोदित तरुण विकास मंडळ, मुंबई ग्रामस्थ व महीला मंडळ साखरी खुर्द/साखरी ब्रुदुक(पवार साखरी ) यांचा कौटुंबिक  मेळावा दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी कुणबी ज्ञाती ग्रुह, (वाघे हॉल ) सेंट झेवियर स्ट्रीट परेल (पुर्व) मुंबई येथे कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका गुहागर चे विद्यमान अध्यक्ष श्री.अनंत मालप, सहसचिटणीस श्री.शांताराम आग्रे, कुणबी युवाचे चे सरचिटणीस श्री.युवराज कांबळे, गुहागर गट अध्यक्ष श्री.सुरेश गिजे, गुहागर गट सरचिटणीस श्री.अनिल भुवड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. Family gathering in Mumbai

छत्रपती शिवाजी महाराज आणि कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संस्थापक कै.गुणाजी वि. माळी ( माळी गुरुजी ), दानशुर नेते कै पांडुरंगशेठ वाघे, समाज नेते कै.शामरावजी पेजे यांच्या प्रतिमेला  मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला केली. अध्यक्ष दत्ताराम बंगाल साहेब आणि कमेटी सदस्यां, महीला मंडळ अध्यक्षा सौ.भाग्यश्री भुवड, सौ.प्रभावती आलिम आणि मान्यवर यांनी दिप प्रज्वलन केलं. वर्षभरातील ज्ञात अज्ञात पण मंडळाच्या आजवरच्या कार्यात मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या गावातील दिगंवत लोकांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. Family gathering in Mumbai

Family gathering in Mumbai

मनोगत व्यक्त करताना श्री.युवराज कांबळे यांनी बळीराजाची आठवण करुन “ईडा पिडा टळो… बळीचं राज्य येवो, याची आठवण करून मुलगी शिकली तरच प्रगती करेल. प्रत्येक कुटुंब सशक्त झाले पाहिजे. उपस्थित महीला वर्गाला अनेक दाखले देऊन मनोगत पुर्ण केले. अध्यक्ष श्री.अनंत मालप यांनी कोटुंबिक मेळाव्याला आमंत्रिण केल्याबद्दल मंडळाचे आभार मानले. आजपर्यंत मी अनेक कार्यक्रमाला गेलो परंतु आपल्या कार्यक्रमात महिला भगिनी सुत्रसंचलन करीत आहेत. अभिमान वाटला. समाजाबद्दलच्या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे महिला मंडळाची उपस्थिती चांगली होती. भविष्यात गुहागर शाखेच्या महिला मंडळाची स्थापना होईल, त्यावेळी महिलांना प्राधान्य देऊ यासाठी आपण सर्वांनी सामाजिक संघटनेच्या प्रवाहात यावे असे आवाहन केले. Family gathering in Mumbai

Family gathering in Mumbai

श्री.भरत भुवड यांनी मंडळाची स्थापना १९८९ साली झाली. तेव्हापासून सहकार्य करणाऱ्या बंधु/भगिनींचे आभार मानले. मंडळाची पार्श्वभुमी सांगितली. गुहागर गटाचे अध्यक्ष श्री.सुरेश गिजे यांनी गुहागर तालुक्यातील पतपेढी बद्दल माहिती सांगितली. कुणबी युवकांसाठी अनेक आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, दरवर्षी उपक्रम राबविण्यात येतात त्याचा फायदा तरुण मुलांनी मुलींनी घ्यावा अशी विनंती केली. वैद्यकीय बाबत काही गरज लागली तर नक्कीच रात्री अपरात्री मदत करू गुहागर शाखेच्या आणि गुहागर गटाच्या जनरल सभेला नक्कीच उपस्थित रहा, अशी विनंती केली. Family gathering in Mumbai

लहान मुलांचे डान्स असल्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. महिलांचा “हळदीकुंकू” समारंभ यशस्वीपणे पार पडला. कौटुंबिक माहीती प्रत्येकांनी सादर केली. त्यामुळे सहाजीकच सर्वांनी आपण कुठे राहतो. आपल्या वाडीतील सदस्यांची माहिती सर्वांना मिळाली. आपण सर्वजन गजबजलेल्या मुंबई नगरीत कुठेही असु पण सुख: दुःखात एकत्र यावे हाच उद्देश मेळाव्याचा होता. असे उद्गार मंडळाचे अध्यक्ष श्री.दत्ताराम बंगाल यांनी काढले. उपस्थितांना चहा, नाष्टा आणि स्नेहभोजन मंडळाच्या माध्यमातून ठेवण्यात आले होते. Family gathering in Mumbai

कार्यक्रमाला  मंडळाचे अध्यक्ष श्री.दत्ताराम बंगाल, संचालक व कार्यक्रम नियोजन कमिटी-अध्यक्ष (गुहागर शाखा कार्यकारिणी सदस्य) श्री.भरत भुवड, सरचिटणीस नवनाथ भुवड तसेच उपाध्यक्ष सुरेंद्र फिल्से, दत्ताराम हुमणे, गणेश हुमणे, संदेश हुमणे, महेंद्र भुवड, समिर भुवड, महिला मंडळ अध्यक्षा सौ.भाग्यश्री भुवड, सौ.प्रभावती आलिम, सौ.सायली हुमणे इत्यादी मंडळाचे पदाधिकारी विशेष म्हणजे पुणे आणि गावपातळीवर ग्रामस्थ , ग्रामसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री.वसंत भुवड व सौ.आरती सुर्वे यांनी केले. Family gathering in Mumbai

Tags: Family gathering in MumbaiGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share243SendTweet152
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.