• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पेवे येथे खोटी ग्रामसभा दाखवणारे चौकशीत दोषी

by Ganesh Dhanawade
December 16, 2022
in Guhagar
189 2
0
Fake Gram Sabha at Pewe

पेवे ग्रामपंचायत इमारत

372
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गटविकास अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ; ग्रामस्थ न्यायालयात दाद मागणार

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पेवे ग्रामपंचायतीची खोटी ग्रामसभा दाखवून ग्रामस्थ व शासनाची फसवणूक करण्यात आली. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील सहा कोटी रुपयांचा रस्ता अडचणीत आणणाऱ्या पेवे सरपंच सौ. भारती सावरटकर आणि ग्रामसेवक श्री. पदमप्पा डोलारी यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पेवे ग्रामस्थांनी गुहागर गटविकास अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, सरपंच व ग्रामसेवक चौकशीत दोषी असताना त्यांना गटविकास अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आता न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. Fake Gram Sabha at Pewe

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

गटविकास अधिकारी यांचे मार्फत विस्तार अधिकारी श्री. कांबळे यांनी केलेल्या चौकशी अहवालामध्ये ग्रामपंचायत पेवे येथे लेखी पडताळणी केली असता. दि. ८ जुलै २०२१ रोजी कोणतीही ग्रामसभा झाल्याचे इतिवृत्त आढळून आलेले नाही. यावरून सदरची ग्रामसभा झालेली नसल्यामुळे इतिवृत्त नसल्याचे दिसून येते. असे असताना बनावट खोटी ग्रामसभा दाखवून ग्रामपंचायत नाहरकत प्रमाणपत्र व ८ जुलै २०२१ च्या ग्रामसभेमध्ये समस्या निवारण समिती स्थापना करून पाच व्यक्तींची नियुक्ती केल्याचा ग्रामसभेचा बनावट तथाकथीत ठराव कार्यकारी अभियंता ग्रामसडक योजना रत्नागिरी यांना दिला असल्याचे चौकशी अहवालात दिसून येतो. या चौकशी अहवालामध्ये पेवे सरपंच व ग्रामसेवक यांना दोषी ठरविण्यात आले आहे. बनावट ग्रामसभा दाखविणे, खोटे पत्रव्यवहार करणे याबाबत ग्रामसेवक आणि सरपंच दोषी आणि जबाबदार असल्याचे चौकशीत नमूद करण्यात आले आहे. Fake Gram Sabha at Pewe

या अहवालानुसार गटविकास अधिकारी श्री. राऊत यांनी पेवे सरपंच सौ. भारती सावरटकर आणि ग्रामसेवक श्री. डोलारी यांना १६ नोव्हें. २०२२ च्या चौकशी अहवालानुसार बनावट ग्रामसभा दाखवणे, खोटे ठराव करणे, ग्रामपंचायत अधिनियमाचा भंग करणे, कर्तव्यात कसूर करणे असे कारणे दाखवा नोटीस दिली आहे. परंतु विविध आरोप ठेवले असताना गटविकास अधिकारी यांनी निव्वल थातुरमातुर कारवाई केली आहे. या चौकशी अहवालात दोषी असताना या संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल न करता गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना अभय दिला आहे. यामध्ये गटविकास अधिकाऱ्याची भूमिका संशस्यस्पद असल्याने पुन्हा गटविकास अधिकारी यांना पेवे ग्रामस्थांच्यावतीने निवेदन
देण्यात आले आहे. Fake Gram Sabha at Pewe

या निवेदनामध्ये पेवे सरपंच हे लोक नियुक्त सदस्य असून ग्रामसेवक हे लोक सेवक आहेत. त्यामुळे सरपंच व ग्रामसेवक यांनी प्रत्यक्षात न झालेली बनावट ग्रामसभा झाल्याचे दाखवून त्या सभेमध्ये नाहरकत प्रमाणपत्र तयार करून व बोगस समस्या निवारण समिती तयार करून फौजदारी पात्र गुन्ह्याचे कृत्य केलेले आहे. असे असताना आपण केवळ थातुरमातूर कारवाई केलेचे दिसून येते. वास्तविक लोकसेवक यांनी बनावट कागदपत्र तयार केल्यानंतर त्या विभागाचे प्रमुख या नात्याने तुम्ही संबधित विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. म्हणूनच पेवे सरपंच सौ. भारती सावरटकर आणि ग्रामसेवक पदमप्पा डोलारी यांचे विरुद्ध फसवणूक व बनावटीकरण या संदर्भात शासनाच्यावतीने आपण तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा आठ दिवसानंतर आम्हाला हा गुन्हा दाखल करण्यासाठी मा. न्यायालयामध्ये दाद मागावी लागेल. व यामध्ये संबंधित लोकांच्या विरोधात ठोस पुरावे असताना पाठिशी घालणाऱ्या अधिकारी वर्गाला जबाबदार धरण्यात येईल, असे निवेदन म्हटले आहे. Fake Gram Sabha at Pewe

न्यायालयात दाद मागणार

पेवे ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर चौकशीमध्ये पेवे सरपंच व ग्रामसेवक यांनी खोटी ग्रामसभा दाखवून बनावट नाहरकत दाखले तयार करणे, बोगस ग्रामसभा दाखवून खोटसाल समस्या निवारण समिती गटीत करणे असे चौकशी अहवालमध्ये सिद्ध झाले असल्याने सरपंच व ग्रामसेवक यांना दोषी ठरवून जबाबदार धरण्यात आले आहे. वास्तविक संबंधितांनी फौजदारी पात्र गुन्ह्याचे कृत्य केले आहे. ७३ व्या घटना दुरूस्तीने मतदार ग्रामस्थांना दिलेल्या अधिकार व हक्क या लोकांनी काढून घेतला आहे. अशावेळी शासनाचे या विभागाचे प्रमुख म्हणून गटविकास अधिकारी श्री. राऊत यांनी फौजदारी गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. परंतु गटविकास अधिकाऱ्यांनी थातूरमातूर कारवाईचा देखावा केला. यावर पेवे ग्रामस्थांनी पुन्हा गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे व तसे न झाल्यास पेवे ग्रामस्थ न्यायालयात दाद मागतील व यामध्ये संबंधीत दोषी लोकांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करणार आहेत. Fake Gram Sabha at Pewe

Tags: Fake Gram Sabha at PeweGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share149SendTweet93
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.