• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 May 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरच्या जागेसाठी आम्ही आग्रही

by Mayuresh Patnakar
October 17, 2024
in Politics
378 3
8
Fadnavis insists on Guhagar's seat

देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी मुंबईत गेलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, विधानसभा संयोजक मोरे, गुहागर तालुकाध्यक्ष सुर्वे आदी पदाधिकारी

742
SHARES
2.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

फडणवीस, बावनकुळेंचा गुहागरच्या पदाधिकाऱ्यांना दिलासा

गुहागर, ता. 16 : गुहागर विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा म्हणून आम्ही आग्रही आहोत. चार दिवसांत याचा निर्णय आपल्याला समजेल. सर्वांनी गुहागर विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी कामाला लागा. अशा सूचना भाजपचे वरिष्‍ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर रत्नागिरीतील कार्यकर्त्यांना दिल्या. Fadnavis insists on Guhagar’s seat

गेले वर्षभर पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी भाजप कार्यकते; झटत होते. गुहागरची जागा भाजपलाच मिळणार हा विश्र्वास वरिष्‍ठांनी दिला होता. लोकसभेनंतर माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या उमेदवारीवर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शिक्‍कामोर्तब केला. मतदारसंघात कहो दिलसे नातू फिरसे या टॅगलाईनला धरुन प्रचाराला सुरवात झाली. सप्टेंबर महिन्यात विधानसभा क्षेत्रात जिल्हा परिषद गटनिहाय खेळ पैठणीचा हा कार्यक्रम महिलांच्या तुडुंब गर्दीत पार पडला. उत्साही कार्यकर्ते वायुवेगाने भाजपचा प्रचार करत होते. Fadnavis insists on Guhagar’s seat

या उत्साहावर सर्वपित्री अमावास्येच्या आधी दोन दिवस पाणी फिरले. गुहागर विधानसभा मतदारसंघ शिवसेना लढणार अशी बातमी येवून धडकली. खासदार श्रीकांत चव्हाण यांच्या नात्यातील विपुल कदम यांचे नाव शिवसेनेचे म्हणून चर्चेत आले. त्यापाठोपाठ गुहागर विधानसभा क्षेत्रात विपुल कदम यांचा फोटो व नाव असलेले धर्मवीर -२ चे बॅनर झळकले. नवरात्र उत्सवात विपुल कदम यांनी मतदारसंघातील 3 प्रचार कार्यालयांचे उद्‌घाटन केले.  त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या प्रचार स्वीच ऑफ झाला. Fadnavis insists on Guhagar’s seat

नवरात्र उत्सवातील सर्व दिवस अस्वस्थेत गेले. त्यानंतर दापोलीत भाजपचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील आले असताना त्यांच्या समवेत भाजपच्या गुहागरमधील कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या नेतृत्त्वात भाजपचे गुहागरमधील मुख्य पदाधिकारी मुंबईत गेले. त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वरिष्‍ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रसाद लाड आदींची भेट घेतली. गुहागरमधील पक्षाची स्थिती, कार्यकर्त्यांची मानसिकता समजून सांगितली. Fadnavis insists on Guhagar’s seat

त्यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांजवळ बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुहागर मतदारसंघ जागावाटपात भाजपला मिळण्यासांठी आम्ही आग्रही आहोत. पुढील चार दिवसात आपल्यापर्यंत निर्णय पोचेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना जिंकण्याच्या तयारीला लागा असे सांगितले. हे सर्व संकेत शुभ संकेत समजून सर्व कार्यकर्ते मंगळवारी रात्री उशिरा विधानसभा क्षेत्रात पोचले आहेत. पुन्हा एकदा उत्साहाने कामाला लागले आहेत. Fadnavis insists on Guhagar’s seat 

Tags: Fadnavis insists on Guhagar's seatGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPoliticsUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share297SendTweet186
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.