• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 July 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

४० वारकरी एकत्र आल्यास गावातूनच सोडणार बस

by Mayuresh Patnakar
July 1, 2026
in Guhagar
23 0
0
Extra buses to be run for Konkan
45
SHARES
129
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्हा एसटी विभागाचा निर्णय, आषाढीसाठी ६५ जादा एसटी बसेस

गुहागर, ता. 01 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी रत्नागिरी आगारासह इतर आठ आगारात तब्बल ६५ जादा एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. एसटी बसेसचे आरक्षण सुरू झाले आहे. जास्तीत जास्त वारकरी भाविकांनी ग्रुपने बसेस बुकिंग कराव्यात, असे आवाहन एसटी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच गावातून किमान ४० किंवा त्यापेक्षा अधिक वारकरी एकत्र आल्यास त्यांना थेट त्यांच्या गावातूनच पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे.  Extra ST buses for Ashadhi

यंदाची आषाढी एकादशी २५ जुलैला होणार असून, वारीसाठी कोकणातून हजारो रत्नागिरीकर पंढरपूरला जात असतात. कोणी चालत तर कोणी खासगी बसेसने जातात. ज्यांना पायी जाणे शक्य नाही असे भक्त, वारकरी आपल्या लाडक्या लालपरीने प्रवास करत पंढरपूरला जातात. त्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास चांगला व सुखकर होण्यासाठी एसटीमहामंडळाच्या रत्नागिरी विभागातून दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही जादा एसटी बसेसचे नियोजन केले आहे. एसटी बसेसच्या आरक्षणाची सुरुवात झाली आहे. Extra ST buses for Ashadhi

महामंडळाच्या वेबसाईट, अॅपवर किंवा बसस्थानकावर आपण आरक्षण करू शकता. आषाढीवारीसाठी यंदाही ७५ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिला, ६५ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त सवलतीचा लाभ सवलतधारकांनी घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. गतवर्षी ५१हून अधिक एसटी बसेस धावल्या होत्या. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून जास्तीत जास्त एसटी बसेस पंढरपूरला सोडण्यात येणार आहे. Extra ST buses for Ashadhi

Tags: Extra ST buses for AshadhiGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share18SendTweet11
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.