गुहागर, ता. 07 : राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. सुरुवातीला अंतिम मुदत 28 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती, मात्र नागरिकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता ती 30 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. Extension for eKYC of Ration Card


यासाठी केंद्र सरकारने “Mera e-KYC Mobile App” आणि “Aadhar Face RD Service App” ही दोन मोबाईल अॅप्स सुरू केली आहेत, ज्यामुळे नागरिकांना घरी बसूनच ई-केवायसी करणे शक्य होणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व रेशनकार्डधारकांना 30 मार्चच्या आत ई-केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, ही प्रक्रिया आता मोबाईल अॅपच्या मदतीने घरबसल्या सहज पूर्ण करता येईल. Extension for eKYC of Ration Card